फेसबुकची ‘अॅप डाऊनलोड’साठी जबरदस्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 15:58 IST2016-06-12T10:22:37+5:302016-06-12T15:58:20+5:30
‘मोमेंट्स’ नावाचे हे अॅप इन्स्टॉल करा अन्यथा ७ जुलैपर्यंत फेसबुक अकाउंटवरील काही फोटो डिलिट करण्यात येतील

फेसबुकची ‘अॅप डाऊनलोड’साठी जबरदस्ती
स शल मीडियावर स्वत: मक्तेदारी गाजविणारे ‘फेसबुक’ आता यूजर्सवर त्यांचे अॅप डॉनलोड करण्यासाठी जबरदस्ती करत आहे.
‘मोमेंट्स’ नावाचे हे फोटो शेअरिंग अॅप डाऊनलोड करून इन्स्टॉल करा अन्यथा ७ जुलैपर्यंत तुमचे फेसबुक अकाउंटवरील काही फोटो डिलिट करण्यात येतील असा मेसेज कंपनीतर्फे पाठवण्यात येत आहे.
नोटिफिकेशनद्वारे यूजर्सना असा संदेश देऊन एका प्रकारे त्यांच्यावर सक्ती केली जात आहे. याविषयी अधिक सुचना फेसबुक अकाउंटच्या ‘सिंक्ड’ फोटो अल्बम पेजवर देण्यात आल्या आहेत. कंपनीच्या या धोरणामुळे अॅप स्टोअरवर ‘मोमेंट्स’ हे नंबर एक अॅप बनले आहे.
आय-ओएस यूजर्ससाठी कंपनीने फोनमधील सर्व फोटो फेसबुक अकाउंटवर एका प्रायव्हेट अल्बममध्ये अॅटोमॅटिक कॉपी करण्याची सुविधा सुरू केली होती. हे फोटो आयफोन अॅपमध्ये ‘सिंक्ड’ नावाच्या अल्बममध्ये तर डेस्कटॉपवर ‘सिंक्ड फ्रॉम फोन’ नावाच्या अल्बममध्ये दिसतात.
अशाच प्रकारे कंपनीने ‘मेसेंजर’ अॅपकडे यूजर्सना आकर्षित करण्यासाठी ‘तुमचे चॅट मेसेजेस मेसेंजरवर वळविण्यात येत आहे’ अशी नोटिफिकेशन देत आहे. सध्या तुम्ही ती स्कीप करू शकता मात्र, पुढे ‘मेसेंजर’ डाऊनलोड करण्यासाठी विचारणा होऊ शकते.