सौंदर्य स्पर्धेतही परंपरेचे पालन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 13:31 IST2016-01-16T01:08:53+5:302016-02-05T13:31:04+5:30

सौंदर्य स्पर्धेतही परंपरेचे पालन इराक म्हटले की डोळ्यासमोर येते युद्ध, आत्मघाती हल्ले, बॉम्बस्फो...

Follow the tradition of beauty competition | सौंदर्य स्पर्धेतही परंपरेचे पालन

सौंदर्य स्पर्धेतही परंपरेचे पालन

ंदर्य स्पर्धेतही परंपरेचे पालन
इराक म्हटले की डोळ्यासमोर येते युद्ध, आत्मघाती हल्ले, बॉम्बस्फोट. पण आता जसा काळ बदलतोय, तसा इराकसुद्धा बदलतोय. नुकतेच तिथे सौंदर्य स्पर्धा (ब्युटी कॉन्टेस्ट) पार पडली. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व परंपरांचे पालन यावेळी करण्यात आले. स्पर्धेत ना सिगारेट, ना दारू आणि ना स्विमसुट (बिकीनी राऊंड) असे काहीही नव्हते. १९७२ नंतर प्रथमच मिस इराक होण्याचा मान वीस वर्षीय शायमा अब्देल रहमान हिला मिळाला. आयोजक हुमाम अल-ओबेदी म्हणाले की, 'जगभरातील लोकांना असे वाटते इराक म्हणजे मृत देश. आम्हाला जीवनाशी प्रेम नाही. त्यामुळे ही स्पर्धा फारच स्पेशल होती.' बगदाद हॉटेलमध्ये पार पडलेल्या मिस इराक स्पर्धेसाठी लोकांनी गर्दी केली होती. शायमाच्या निवडीनंतर तर लोकांनी तिच्या नावाचा गजर सुरू केला. लोक तिच्यासोबत फोटो, सेल्फी घेण्यासाठी धडपड करू लागले. बहू-पारंपरिक शहर किरकुक येथील रहिवासी शायमा म्हणाली, 'लोकांच्या चेहर्‍यावरचे हास्य, आनंद पाहून मला खूप छान वाटत आहे. इराक आता नव्याने सुरुवात करत आहे. नव्या आशेची, नव्या भविष्याची ही नांदी आहे.'

Web Title: Follow the tradition of beauty competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.