घरच्या घरी मेकअपचे नऊ नियम पाळा आणि पार्लरला जावून मेकअप करण्याचा खर्च वाचवा!

By Admin | Updated: May 4, 2017 17:51 IST2017-05-04T17:51:10+5:302017-05-04T17:51:10+5:30

मेकअपचा स्वत:मधला सेन्स थोडा वाढवला तरी घरच्याघरी मेकअप चांगला जमतो..यासाठी मेकअप करताना फक्त नऊ गोष्टी जमायला हव्यात

Follow the nine rules of home make-up and save the cost of make-up to the parlor! | घरच्या घरी मेकअपचे नऊ नियम पाळा आणि पार्लरला जावून मेकअप करण्याचा खर्च वाचवा!

घरच्या घरी मेकअपचे नऊ नियम पाळा आणि पार्लरला जावून मेकअप करण्याचा खर्च वाचवा!

घरच्या घरी मेकअपचे नऊ नियम पाळा आणि पार्लरला जावून मेकअप करण्याचा खर्च वाचवा! मेकअप हा सर्वच बायकांना करावासा वाटतो. मग त्या नोकरदार असो नाहीतर गृहिणी. पण मेकअप म्हटला की तो पार्लरमध्येच जाऊन करायला पाहिजे असं नाही. मेकअपचा स्वत:मधला सेन्स थोडा वाढवला तरी घरच्याघरी मेकअप चांगला जमतो. नुसत्याच छोट्या प्रसंगासाठी नाही तर मोठ्या सण समारंभानाही तयार होताना मेकअपसाठी पार्लरमध्ये जावं लागत नाही.यासाठी मेकअप करताना फक्त नऊ गोष्टी जमायला हव्यात.  

घरच्याघरी मेकअपचे नऊ नियम

1) मेकअप म्हणजे छान नटणं-थटणं असं खूपजणींना वाटत असल्यामुळे मेकअप करून बाहेर जाणं अथवा मुलांच्या शाळेतील मिटिंगसाठी म्हणून मेकअप करणं ही कल्पना तितकीशी पटत नाही. पण मेकअप ही बदलत्या काळाची गरज आहे आणि त्याच जोडीला मेकअपमुळे व्यक्तिमत्त्व आणि बाह्य सौंदर्य खुलून दिसतं. आपला आत्मविश्वास वाढतो. छान वाटतं स्वत:विषयी! 2)मेकअप करायचा म्हणजे तो अगदी भडकच करायला हवा असं नसून आपल्या आवडीप्रमाणे आणि गरजेप्रमाणे करावा. योग्य मेकअप केल्यास तो केला आहे असं भासतही नाही; पण अशा मेकअपमुळे चारचौघीत आपण उठून मात्र दिसतो.मेकअप करताना आपली त्वचा, रंग, आवड आणि बाहेरचं वातावरण यासर्वांचा विचार करावा लागतो.

3) मेकअप करताना ऋतूमानाचं भान मात्र ठेवायलाच हवं. सध्या कडक उन्हाळा आहे त्यामुळे भर उन्हामध्ये कुठे जायचं असेल तर खूप भडक रंग वापरूनही चालत नाही. अशा वेळेस गुलाबी, पिच कलर अशा रंगाचे आयशॅडो, लिपस्टिक तसेच ब्लशआॅन वापरावेत. हे सर्व रंगही जर जास्त वाटत असतील तर ब्राउन कलर वापरावा. आणि ज्यांना रंग वापरणंच आवडत नसेल अथवा काही ठराविक कार्यक्रमांनाच रंग वापरावे असं वाटत असेल त्यांनी मेकअप म्हणून फक्त फाउंडेशन, आयलायनर, काजळ आणि लिपस्टिक एवढंच वापरलं तरी पुरे!

 

Web Title: Follow the nine rules of home make-up and save the cost of make-up to the parlor!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.