पहिले गर्भाशय प्रत्यारोपण अयशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2016 04:48 IST
अमेरिकेत पहिली गर्भाशय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. मात्र, अचानक बिघाड झाल्यामुळे गर्भाशय काढावे लागले.
पहिले गर्भाशय प्रत्यारोपण अयशस्वी
अवयव प्रत्यारोपणामुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळाले आहे. किडनीपासून ते हृदयापर्यंत अनेक महत्त्वाच्या अवयवांचे प्रत्यारोपण करण्याचे महारथ वैद्यकशास्त्राने अवगत केले आहे.गेल्या महिन्यात अमेरिकेत पहिली गर्भाशय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र, रुग्णाच्या आरोग्यात अचानक बिघाड झाल्यामुळे रोपण केलेले गर्भाशय काढावे लागले.क्लिव्हलँड क्लिनिकने दिलेल्या माहितीनुसार, २४ फेब्रुवारी रोजी लिंडसे नावाच्या २६ वर्षीय मुलीवर गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले होते. सुरुवातीला हा प्रयत्न यशस्वी झाला असे वाटले.पण अचानक लिंडसेला त्रास सुरू झाल्यामुळे आम्ही गर्भाशय काढण्याचा निर्णय घेतला. आनंदाची बातमी की, लिंडसेची तब्येत आता सुधारत असुन तिला कोणतेही हानी पोहचली नाही.एका संशोधन प्रोजेक्ट अंतर्गत जन्मत: गर्भायश नसलेल्या दहा महिलांवर गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात येणार आहे. नवीन अवयवाचे प्रत्यारोपन केल्यावर तो शरीराशी जुळवून घेताना जर अडचण आली तर अवयव काढून टाकावा लागतो. लिंडसे म्हणाली की, मी सर्व डॉक्टरांचे आभार मानू इच्छिते. माझ्या सुरक्षेसाठी त्यांनी खूप मेहनत घेतली. माझ्यासाठी प्रार्थना आणि शुभेच्छा देण्याऱ्या सर्वांना मी धन्यवाद देते.स्वीडनमध्ये २०१३ साली यशस्वीरीत्या एका महिलामध्ये गर्भाशय प्रत्यारोपण करण्यात आले होते.