‘कबाली’च्या फर्स्ट डे, फर्स्ट शोसाठी विशेष विमानाने जाणार रजनीचे चाहते!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2016 17:10 IST2016-06-25T11:40:44+5:302016-06-25T17:10:44+5:30
मेगास्टार रजनीकांत यांचा ‘कबाली’ हा चित्रपट येत्या १५ जुलैला रिलीज होत आहे. रजनीकांतचे १८० चाहते एका विशेष विमानाने बेंगळुरुवरून चेन्नईला ‘कबाली’ पाहायला येत आहेत.
.jpg)
‘कबाली’च्या फर्स्ट डे, फर्स्ट शोसाठी विशेष विमानाने जाणार रजनीचे चाहते!
म गास्टार रजनीकांत यांचा ‘कबाली’ हा चित्रपट येत्या १५ जुलैला रिलीज होत आहे. रजनीकांतच्या चाहत्यांचे एक एक किस्से ऐकण्यासारखे आहे. ताजा किस्सा म्हणजे, रजनीकांतचे १८० चाहते एका विशेष विमानाने बेंगळुरुवरून चेन्नईला ‘कबाली’ पाहायला येत आहेत. स्मिथा सरमा रंगनाथन ही सुद्धा यापैकीच एक़ केवळ आणि केवळ ‘कबाली’ चा फर्स्ट डे ,फर्स्ट शो पाहण्यासाठी स्मिथाने ७,८६० रूपयांचे प्लेन तिकिट खरेदी केली. ‘कबाली’ पाहण्याची खरी मज्जा चेन्नईतच आहे,असे ३६ वर्षांच्या स्मिथाचे मत आहे. ‘कबाली’ पाहिल्यानंतर स्मिथासह रजनीचे १८० चाहते पुन्हा बेंगळुरुला परत जातील.