​ आर्चीची पहिल्याच दिवशी शाळेला दांडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2016 16:07 IST2016-06-16T10:37:13+5:302016-06-16T16:07:13+5:30

१५ जूनला संपूर्ण महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्या. उन्हाळी सुटी संपून आर्चीची शाळाही सुरू झाली.

On the first day of Archie, | ​ आर्चीची पहिल्याच दिवशी शाळेला दांडी

​ आर्चीची पहिल्याच दिवशी शाळेला दांडी

जूनला संपूर्ण महाराष्ट्रात शाळा सुरू झाल्या. उन्हाळी सुटी संपून आर्चीची शाळाही सुरू झाली. शाळेच्या पहिल्या दिवशी ‘सैराट’ फेम आर्चीच्या स्वागातसाठी जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र रिंकू शाळेत उपस्थित राहणार नसल्याची कोणालाच कल्पना नव्हती. त्यामुळे विद्यार्थ्यांचे सर्व मनसुबे फोल ठरले.
‘सैराट’ चित्रपटामुळे महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात पोहोचलेली ‘आर्ची’ अर्थात रिंकू राजगुरू शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहू शकली नाही. त्यामुळे तिच्या वर्ग मित्र-मैत्रिणींसोबतच संपूर्ण शाळेतील विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला. रिंकूने यंदा इयत्ता दहावीत प्रवेश केला आहे. 

रिंकू राजगुरु ‘सैराट’ चित्रपटामुळे रिंकूच्या आयुष्याला स्टारडमचे वलय निर्माण झाले असल्यामुळे तिला सध्या सुरूवातीसारखे अगदी सहज कुठेही फिरता येत नाही. ती जिथे जाते तिथे ‘सैराट’ चाहते एकच गर्दी करतात. शाळेच्या पहिल्या दिवशी देखील अगदी तसेच वातावरण पाहायला मिळाले. रिंकू शाळेतील प्रत्येक विद्यार्थी ती येण्याची वाट पाहत होता. चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी रिंकूने अभ्यासाकडे दुर्लक्ष केलेले नव्हते. इयत्ता नववीत तिने ८१ टक्के गुण मिळवले. पण ‘सैराट’ला मिळालेल्या अभुतपूर्व यशानंतर रिंकू स्टार झाली असल्याने तिच्या दैनंदिन जीवनात अनेक बदल घडून आलेले पाहायला मिळत आहेत. वाचा: ‘सैराट’ पाहिल्यानंतर वरुण धवन आणि करण जोहर काय म्हणाले? रिंकू शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहणार नसल्याची कल्पना नव्हती. तिची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. एक खास सरप्राईज देखील ठेवले होते. पण आमची निराशा झाली. तरीसुद्धा आम्ही इतक्यात तिचे सरप्राईज उघड करणार नाही. ती जेव्हा शाळेत येईल तेव्हा तिचे आम्ही छान स्वागत करु, असे रिंकूची वर्गमैत्रिण वैशाली कुंभार हिने सांगितले.

Web Title: On the first day of Archie,

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.