शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

​मराठीतील पहिला ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’ स्टॅन्ड-अप शो

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2016 21:01 IST

आशुतोष दाबके या स्टँडअप कॉमेडियनने निव्वळ आणि निखळ ‘प्रौढ विनोदां’चा एकपात्री प्रयोग सुरू केला आहे.

‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’ हा प्रकार आता आपल्याकडे बर्‍या प्रमाणावर रु जू होत आहे. सिनेमांपासून ते लाईव्ह शो अशा स्वरुपात ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’ सादर केली जाते.इंग्रजी किंवा हिंदीमध्ये अशा प्रकारचे लाईव्ह शो मोठ्या प्रमाणात होतात़; मात्र आता मराठीमध्येसुद्धा आशुतोष दाबके या स्टँडअप कॉमेडियनने निव्वळ आणि निखळ ‘प्रौढ विनोदां’चा एकपात्री प्रयोग सुरू केला आहे.‘वेट विकेट’ या नावाचा धमाल स्टँडअप शो ते सादर करतात. मराठी प्रेक्षकांसाठी तुलनेने नवीन असणारा हा कार्यक्रम आता मुंबई-पुण्यानंतर विविध शहरात सादर होत आहे.शनिवारी (दि. २५ जून) नाशिक येथे तर रविवारी (दि. २६) औरंगाबाद येथे ‘वेट विकेट’चा प्रयोग होणार आहे. रोजच्या आयुष्यात घडणारे प्रसंग, घटना आणि सवयी ‘चावट चटकदार’ भाषेत (पण अश्लील नाही!) फुलवून, सजवून सांगणारा हा कार्यक्रम आहे. ‘आपल्या प्रत्येकामध्ये थोड्या-जास्त प्रमाणात चावटपणा असतो. फक्त चारचौघांत तो दिसू न देण्याचा आपला प्रयत्न असतो. असेच जाहीरपणे न बोलता येणारे पण आपसुक चेहर्‍यावर हसू आणणारे विनोद ‘वेट विकेट’मध्ये मी सादर करतो. असे करत असताना अश्लीलता किंवा लैंगिकतेचा लवलेशही नसतो. पती-पत्नी आणि इतर प्रौढ लोक  या वेगळ्या धाटणीच्या कार्यक्रमाचा निसंकोचपणे आनंद घेऊ शकतात, अशी माहिती आशुतोष दाबके यांनी ‘सीएनएक्स’ला दिली.दोन तासांच्या या एक पात्री कार्यक्रमाचे अद्याप बारा खेळ झाले आहेत.विशेष म्हणजे आशुतोष हे काही व्यावसायिक कलाकार नाहीत. ते सांगतात, ‘खाजगी कंपनीमध्ये मी नोकरी करायचो. पण सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये माझा आवर्जुन सहभाग राहायचा. कथा-विनोद-कविता लिहिण्याचा मला लहानपणापासूनच छंद होता. ‘प्रौढ विनोद’ मराठी रंगभूमीवर सहसा पाहायला मिळत नाही. मी त्याला मनोरंजनाचा एक विशेष प्रकार मानतो. पु.ल. देशपांडे - व. पु. काळेसारख्या महान साहित्यिकांच्या विनोदावर प्रगल्भ झालेल्या मराठी रसिकांना ‘अ‍ॅडल्ट कॉमेडी’चा हा अनुभव नक्कीच आवडेल याची खात्री आहे.’