​अखेर ‘लिंक्डईन’ने मान्य केली पासवर्डची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2016 20:39 IST2016-05-28T15:09:00+5:302016-05-28T20:39:00+5:30

2012 साली हॅकर्सने लिंक्डईन यूजर्सची माहिती चोरली होती. सर्व यूजर्सना ईमेलद्वारे अशा प्रकारचे हॅक झाल्याच कंपनीने मान्य केले आहे.

Finally, LinkedIn approved the theft of the password | ​अखेर ‘लिंक्डईन’ने मान्य केली पासवर्डची चोरी

​अखेर ‘लिंक्डईन’ने मान्य केली पासवर्डची चोरी

रोफेशनल नेटवर्किंग साईट ‘लिंक्डईन’च्या सुमारे 16.7 कोटी यूजर्सचे पासवर्ड आणि इतर खाजगी माहिती चोरी झाल्याच्या प्रकरणाबाबत अखरे कंपनीने चार वर्षांनंतर प्रथमच स्पष्टीकरण दिले आहे.

2012 साली हॅकर्सने लिंक्डईन यूजर्सची माहिती चोरली होती. आपल्या सर्व यूजर्सना ईमेलद्वारे अशा प्रकारचे हॅक झाल्याच कंपनीने मान्य केले आहे.

सुमारे 40 कोटी यूजर असलेल्या लिंक्डईनने ईमेलमध्ये सांगितले की, 2012 साली चोरी झालेले पासवर्ड्स आणि इतर खाजगी माहिती हॅकर्सने 17 मे, 2016 रोजी इंटरनेटवर उपलब्ध केल्याचे आमच्या निदर्शनास आले. त्यानंतर सुरक्षेच्यादृष्टीने  संशयास्पद अकाउंट्सचे पासवर्ड रद्द क रण्यात आले आहेत.

2012 पूर्वी अकाउंट तयार झालेले अकाउंट्स ज्यांनी हॅकिंगनंतर आपला पासवर्ड रीसेट केला नाही केवळ अशाच यूजर्सचे पासवर्ड इनव्हॅलिड करण्यात आले आहेत.

त्याबरोबरच विविध सुरक्षा सॉफ्टवेअर्सच्या माध्यमातून संशायास्पद अकाउंट्सचा शोध घेण्यात येणार असल्याचे कंपनीने ईमेलमध्ये नमूद केले आहे. या कामात कायद्याची अंमलबजावणी करणााऱ्या संस्थांची देखील मदत घेतली जाणार आहे.

सुरक्षेबाबत अधिक काळजी घेण्याची कंपनीने यूजर्सना विनंती केली आहे. कंपनीची सुरक्षा समिती अशाप्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी सदैव तत्पर असल्याची माहिती कंपनीने दिली. ठराविक काळानंतर पासवर्ड बदलण्याची सुचना त्यांनी दिली आहे. 

Web Title: Finally, LinkedIn approved the theft of the password

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.