​अखेर हेफ्न्रने ‘प्लेबॉय मॅन्शन’ विकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2016 22:48 IST2016-06-08T17:18:09+5:302016-06-08T22:48:09+5:30

​प्लेबॉय एंटरप्राईजेसच्या मालकीची ‘द होल्म्बी हिल्स’ इस्टेट डेरेन मेट्रोपोलस यांनी खरेदी केली आहे.

Finally, Hefner sold 'Playboy Mansion' | ​अखेर हेफ्न्रने ‘प्लेबॉय मॅन्शन’ विकले

​अखेर हेफ्न्रने ‘प्लेबॉय मॅन्शन’ विकले

ॅडल्ट मॅगझिन ‘प्लेबॉय’चा संस्थापक आणि मुख्य संपादक ह्यु हेफ्नरने जगप्रसिद्ध ‘प्लेबॉय मॅन्शन’ त्यांच्या शेजाऱ्यालाच 100 मिलियन डॉलर्सपेक्षा (सुमारे 660 कोटी रु.) जास्त किंमतीमध्ये विकले आहे.

प्लेबॉय एंटरप्राईजेसच्या मालकीची ‘द होल्म्बी हिल्स’ इस्टेट डेरेन मेट्रोपोलस यांनी खरेदी केली आहे.

काही दिवसांपूर्वी ह्यु हेफ्नरने ‘प्लेबॉय मॅन्शन’ विक्रीस काढले होते. 200 मिलियन डॉलर्स एवढी किंमत त्यांना अपेक्षित होती. आता या व्यवहाराची खरी किंमत जरी जाहीर करण्यात आली नसली तरी 100 मिलियन डॉलर्सपेक्षा जास्त किंमत मिळाल्याची खबर आहे. 

5.3 एकर जागेवर पसरलेल्या या प्लेबॉय मॅन्शनमध्ये एकूण 22 रुम्स, वाईन सेलर, स्क्रीनिंग रुम, गेम रुम, टेनिस, बास्केटबॉल कोर्ट, वॉटरफॉल आणि स्विमिंगपूल अशा सुविधा आहेत. 1927 साली हे घर आर्थर आर. केली यांनी डिझाईन केले होते.

डेरेनला मात्र या महलाचा ताबा आताच मिळणार नाही. 90 वर्षांचा ह्यु मृत्यूपर्यंत येथे राहणार आहे. 
डेरेन हा अब्जाधीश सी. डीन मेट्रोपोलस यांचा मुलगा आहे. 2009 साली त्याने प्लेबॉरू मॅन्शनच्या समोरील घर 18 मिलियन डॉलर्समध्ये खरेदी केले होते.

Web Title: Finally, Hefner sold 'Playboy Mansion'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.