​फिल्म सेलिब्रिटींनाही ‘वेणी’ची मोहिनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 19:51 IST2016-06-12T14:10:49+5:302016-06-12T19:51:07+5:30

लांबसडक केस व्यवस्थित बांधता यावे यासाठी बांधल्या जाणाºया केसांच्या वेणीचे आता इंग्रजीत नवीन नामकरण झाले असून ती आता ब्रेडिंग या गोंडस नावाने ओळखली जाऊ लागली आहे

Film celebrities also love 'Winnie' charm | ​फिल्म सेलिब्रिटींनाही ‘वेणी’ची मोहिनी

​फिल्म सेलिब्रिटींनाही ‘वेणी’ची मोहिनी

n style="color:#FF0000;">लांबसडक केस व्यवस्थित बांधता यावे यासाठी बांधल्या जाणाºया केसांच्या वेणीचे आता इंग्रजीत नवीन नामकरण झाले असून ती आता ब्रेडिंग या गोंडस नावाने ओळखली जाऊ लागली आहे. ही ब्रेडिंग थेट रॅम्पवरून रेड कारपेटवर अवतरली आहे. फॅशनच्या युगात कोणत्या स्टाईलला कधी सुगीचे दिवस येतील याबाबत काहीच सांगता येत नाही. सध्या वेणीच्या आकर्षक ठेवणीचे प्रकार पाहायला मिळत असून त्यामुळे बॉलिवूड, हॉलिवूड सेलिब्रिटींबरोबरच तरुणींमध्येदेखील स्टायलीशपणा दिसून येत आहे.

तरुणींना भूरळ घालणाऱ्या वेणींचे प्रकार 

फ्रेंच ब्रेडिंग
मैदानी खेळ खेळताना, डान्स, व्यायाम या दरम्यान अनेकजण फ्रेंच ब्रेडिंग बांधतात. कारण यापद्धतीने बांधलेल्या वेणीतले केस सहज सुटत नाही. या पद्धतीत नेहमी तीन पदरी वेणीप्रमाणेच असते, फक्त ती डोक्याच्या वरच्या बाजूपासून सुरू होते. दोन वेण्या या पद्धतीने बांधल्यास त्यास बॉक्सर ब्रेडिंग म्हणतात.

फिशटेल ब्रेडिंग
या पद्धतीत केसांना फुगीरपणा येतो. त्यामुळे केस दाट नसले, तरी ही वेणी बांधता येते. या वेणीची ठेवण करताना पोनीटेल बांधून केसांचे दोन भाग करावे, उजव्या भागातून अर्ध्या इंचाची केसांची बट घेऊन तिला डाव्या बाजूच्या बटीमध्ये गुंफावे. त्यानंतर डाव्या बाजूची बट घेऊन उजव्या बाजूला गुंफावे. विशेषत: साईड पार्टशिन करून बांधलेली मेस्सी लूकची वेणी आकर्षक व सुंदरच दिसते.

मिल्कमेड ब्रेडिंग
मिल्कमेड ब्रेडिंगमध्ये डोक्यावर छानसा मुकुट खोवला जातो. याची ठेवण करताना नेहमीप्रमाणे दोन वेण्या बांधून घ्या. त्यानंतर एखाद्या मुकुटाप्रमाणे वेण्या डोक्याच्या वरच्या बाजूला एकमेकांमध्ये खोवून घ्या. या खोवलेल्या वेण्यांमध्ये फुले, टिकल्या, स्टड्स लावून वेणीला उठाव आणून आकर्षक करता येते. डोक्यावर मुकुट दिसत असल्याने तरुणीचे व्यक्तिमत्त्व हे राजकुमारी सारखे दिसणार हे नक्कीच.

फेदर ब्रेडिंग
याप्रकारात वेणी खूप नाजूक व आकर्षक दिसते. ही वेणी नेहमीप्रमाणे सरळ रेषेत बांधण्याऐवजी आडव्या रेषेत बांधली जाते. तसेच केसांना हायलाईट केल्यास केसांचा रंग फोकसमध्ये येण्यास मदत होते. केसांना वेव्ह आणि किंचित कलर्स दिल्यास साधी हेअरस्टाईलसुद्धा या वेणीमुळे खुलून दिसते. त्यामुळे बºयाचदा पार्टीजमध्ये या पद्धतीच्या वेणी घातल्या जातात.

वेणी कशी कॅरी कराल?
आपल्या लूकला छोटासा ट्विस्ट मिळण्यासाठी नेहमीचा पोनीटेल बांधण्यापेक्षा लहान बटांच्या दोन-तीन वेण्या बांधू शकता. तसेच मोकळे केस व वेण्या यांचा एकत्रित पोनीटेलही बांधू शकता. पारंपरिक लूक हवा असल्यास वेणीसोबत परांदा वापरावा. परांदा हा पंजाबी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग असून एखाद्या दिवशी लांबसडक केस मिरवायचे असतील, तर परांदा बांधून पाहायलाच हवा.
हे जरी पारंपरिक प्रकार असले तरी यात बाजारात मिळणारे विविध प्रकारचे बो, हेअरबॅण्ड्स, डेकोरेटिव्ह फुलं, मोती, स्डड्स यामुळे तुम्हाला तुमच्या पद्धतीने आणि आवडीनुसार त्याचा उपयोग करू शकता. 

शाहीद कपूर आणि आलिया भट यांच्या शानदार चित्रपटात आणि प्रमोशनच्या काळात आलियाने वेणीच्या केलेल्या वेगवेगळ्या स्टाईल्स बºयाच गाजल्या. त्यानंतर दीपिका पदुकोन, सोनम कपूर, करिना कपूर, बिपाशा बसू अशा कित्येक बॉलिवूड सेलेब्रिटींनी वेण्या मिरवायला सुरुवात केली. उन्हामुळे आणि दमट वातावरणामुळे येणारा घाम हा असह्य असतो, त्यामुळे केस मोकळे सोडणे हा पर्याय हद्दपार होताना दिसत आहे. त्यानंतर येणाºया पावसाळ्यात छत्री व बॅगेसोबत केस सांभाळताना अधिकच त्रास होतो. मग अशावेळी खास आकर्षक ठेवणीतल्या वेणी व हेअरस्टाईल्सची आठवण होते. 

Web Title: Film celebrities also love 'Winnie' charm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.