जुळ्या मुलांचे वडील वेगवेगळे
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2016 07:48 IST2016-03-17T14:48:53+5:302016-03-17T07:48:53+5:30
महत्त्वाची गोष्ट म्हणजे जन्माला आलेल्या जुळ्यांचे वडील वेगवेगळे आहेत.
.jpg)
जुळ्या मुलांचे वडील वेगवेगळे
नॉर्थ व्हिएतनामच्या होअ बिन प्रॉव्हिन्समधी दोन वर्षांच्या बाळांपैकी एक जाड असून त्याचे केस दाट आहेत तर दुसरा बारीक असून त्याचे केसही विरळ आहेत. तसेच त्यांच्या दिसण्यातही फरक आहे. मुलांची अदलाबदली झाली, असे त्यांच्या आई-वडिलांना वाटले. त्यानंतर दोन्ही बाळांचे पिता आपणच आहोत का, यासाठी वडिलांनी डीएनए चाचणी करण्याचा निर्णय घेतला.
पण दोघांची आई एकच असून वडील मात्र दोन आहे, असे डीएनए चाचणीत समोर आलेय. व्हिएतनाममधील ही पहिली घटना आहे. पण व्हिएतनामच नाही जगासाठी हे दुर्मिळ प्रकरण आहे.