जगातील बेस्ट शेफच्या बायकोने चालू ठेवला पुढे वसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 09:03 IST2016-02-05T03:33:55+5:302016-02-05T09:03:55+5:30

जगातील बेस्ट शेफच्या बायकोने चालू ठेवला पुढे वसा मागच्या आठवड्यात प्रसिद्ध शेफ बेनॉईत वायलिएरने आत्म

The fat of the world's best chef kept on continuing | जगातील बेस्ट शेफच्या बायकोने चालू ठेवला पुढे वसा

जगातील बेस्ट शेफच्या बायकोने चालू ठेवला पुढे वसा

गच्या आठवड्यात प्रसिद्ध शेफ बेनॉईत वायलिएरने आत्महत्या केल्याच्या वृत्ताने जगभर खळबळ माजवली. केवळ चार महिन्यांपूर्वी त्याच्या ‘रेट्राँ दि ला हॉटेल दि विले’ या हॉटेलची जगातील सर्वोत्कृष्ट हॉटेल म्हणून निवड करण्यात आली होती. आत्महत्येचे कोणतेही कारण अजून स्पष्ट झाले नाही. तो गेल्यानंतर आता या हॉटेलचे काय म्हणून सगळीकडे चर्चा सुरू झाली. पतीच्या निधनानंतर हिंमत एकत्र करून त्याची बायको ब्रिगेटने आता हॉटेल पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ‘माझ्या पतीचे काम थांबणार नाही. ते मी पुढे नेणार’ या निर्धारेने रेस्ट्राँची री-ओपनिंग केली.

स्विट्झरलँडच्या निसर्गरम्य क्राईसर शहरात ही हॉटेल आहे. फे्रंच गाईड बुक कंपनी ‘ला लिस्टे’ने तीन मिशिलिन स्टार्स देऊन बेनॉईतच्या होटेलचा गौरव केला होता. केवळ चार वर्षात त्यांनी ही कामागीरी करून दाखविली होती. पतीची लेगसी पुढे चालू ठेवण्यासाठी ब्रिगेटने सर्व स्टाफ एकत्र बोलवून रेस्ट्राँ पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. 
एका ग्राहकाने सांगितले की, ‘काही दिवसांपूर्वी या हॉटेलमध्ये टेबल रिझर्व केला होता. बेनॉईतच्या निधनानंतर मात्र मला हॉटेल सुरू असेल की नाही याबाबत शंका होती. मला ब्रिगेटचा फोन आला. ती म्हणाली, आम्ही हॉटेल पुन्हा सुरू करत आहोत. तुम्ही आम्हाला साथ देणार का? मला ही फार धैर्यवान गोष्ट वाटली. शेवटी जीवन चालूच राहते.’

2013 साली गॉल्ट अँड मिलाऊ गाईडने बेनॉईतची ‘शेफ आॅफ द इअर’ म्हणून निवड केली होती. आत्महत्येच्या चार दिवस आधी त्याने एका फ्रेंच वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटले होते की, ‘गाईड बुक मला किंवा माझ्या हॉटेलला किती स्टार देतात याने मला काही फरक पडत नाही. माझे ग्राहक चवीवर खूश होऊन परत परत येतात का हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचे आहे.’ यावेळी तो तणाव अथवा आत्महत्येसंबंधी अशा कोणत्याच स्थितीत दिसत नव्हता.

Web Title: The fat of the world's best chef kept on continuing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.