शांघाय टॉवरमध्ये सर्वात वेगवान लिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 21:18 IST2016-05-17T15:48:18+5:302016-05-17T21:18:18+5:30

जगातील सर्वात वेगवान लिफ्ट शांघाय टॉवर्समध्ये बसविण्यात येणार आहे.

Fastest lift in the Shanghai Tower | शांघाय टॉवरमध्ये सर्वात वेगवान लिफ्ट

शांघाय टॉवरमध्ये सर्वात वेगवान लिफ्ट

ातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात उंच इमारत म्हणजे चीनमधील शांघाय टॉवर. दुबईच्या ‘बुर्ज खलिफा’पेक्षा केवळ काही फुटाने लहान या इमारतीमध्ये आता पर्यटकांसाठी नवे आकर्षण असणार आहे.

जगातील सर्वात वेगवान लिफ्ट शांघाय टॉवर्समध्ये बसविण्यात येणार आहे.

‘मित्सुबिशी इलेक्ट्रिक’ कंपनीने ही लिफ्ट तयार केली असून तिचा वेग 1.23 किमी प्रतिमिनिट एवढा प्रचंड असणार आहे. या इमारतीमध्ये या आधीच वेगवान लिफ्ट्स आहेत. त्यात आणखी मोठी भर म्हणजी ही नवी लिफ्ट असणार. 

बफर, ट्रॅक्शन रोप आणि वेग नियंत्रकामुळे या लिफ्टमधून जाणाऱ्याना कसलीच भिती नसणार. लोकांच्या संपूर्ण सुरक्षेची काळजी या लिफ्टमध्ये घेण्यात आली आहे. वर्षाच्या अखेरिस ही लिफ्ट सुरू होणार आहे.

Web Title: Fastest lift in the Shanghai Tower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.