90च्या दशकातल्या सॅटिन ट्रेन्डची सध्या बॉलिवूडमध्ये चलती!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 17:20 IST2018-08-30T17:17:21+5:302018-08-30T17:20:07+5:30
सध्या बॉलिवूडमध्ये एक फॅशन ट्रेन्डमध्ये आहे ती म्हणजे सॅटिन ड्रेसेसची. 90च्या दशकामध्ये सर्वात लोकप्रिय असणारा फॅशन ट्रेन्ड पुन्हा एकदा लोकप्रिय झाला आहे.

90च्या दशकातल्या सॅटिन ट्रेन्डची सध्या बॉलिवूडमध्ये चलती!
सध्या बॉलिवूडमध्ये एक फॅशन ट्रेन्डमध्ये आहे ती म्हणजे सॅटिन ड्रेसेसची. 90च्या दशकामध्ये सर्वात लोकप्रिय असणारा फॅशन ट्रेन्ड पुन्हा एकदा लोकप्रिय झाला आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींपासून अनेक तरूणी या फॅशनचा ट्रेन्डमागे वेड्या झाल्या आहेत. सॅटिनच्या टॉप्सपासून ते सॅटिनच्या ड्रेसेसपर्यंत बाजारामध्ये उपलब्ध आहेत.
बॉलिवूडची देसी गर्ल प्रियांका चोप्रा यादिवसात निकसोबतच्या रिलेशनमुळे जेवढी चर्चेत आहे तेवढीच ती तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठीही चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी प्रियांका बेल स्लिव्सच्या ग्रीन कलरच्या सॅटिन टॉपमध्ये दिसून आली. जो तिने मॅचिंग कलरच्या शियर फॅब्रिकच्या फ्लेयर्ड पॅन्टसोबत घातला होता. तुम्ही पाहिजे तर या सॅटिन टॉपला पलाजो किंवा जीन्सवर घालू शकता.
लेटेस्ट फॅशन ट्रेन्ड आणि करिना कपूर म्हणजे जुळून आलेलं समीकरण.
काही दिवसांपूर्वी ऑलिव्ह रंगाच्या सॅटिन टॉपमध्ये करिना दिसली होती. करिना यामध्ये फार सुंदर दिसत असून तिचा लूक पार क्लासी दिसत आहे. हा लूक तुम्हीही सहज कॅरी करू शकता.
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्राला साड्या फार आवडतात. अनेकदा शिल्पाला साड्यांसोबत वेगवेगळे प्रयोग करताना पाहण्यात आलं आहे. परंतु यावेळी शिल्पाने फॉर्मल पॅन्ट सूटसोबत एक्सपरिमेंट केला आहे. शिल्पाने ऑफ वाइट कलरचा सॅटिन व्हाइट सूट घातला होता. ज्यामध्ये ती ड्रॅमॅटिक लूकमध्ये नजर आली.
अक्षय कुमारसोबत गोल्ड चित्रपटात दिसलेली अभिनेत्री मौनी रॉय आपल्या फॅशनेबल आणि स्टायलिश अदांसाठी फॅन्समध्ये नेहमी चर्चेत असते. गोल्डच्या प्रमोशनदरम्यान मौनी रॉयने यलो कलरचा एसीमिट्रिकल सॅटिन ड्रेस घातला होता.