FASHION : मुलींनो, तरूण दिसण्यासाठी वापरा हे कपडे !
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2017 19:25 IST2017-03-23T13:55:50+5:302017-03-23T19:25:50+5:30
आपण चिरतरूण दिसावे असे प्रत्येक तरूणीला वाटते. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या माध्यमांमध्ये कपडेदेखील महत्त्वाची भूमिका बजावतात.

FASHION : मुलींनो, तरूण दिसण्यासाठी वापरा हे कपडे !
आपण चिरतरूण दिसावे असे प्रत्येक तरूणीला वाटते. त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या माध्यमांमध्ये कपडेदेखील महत्त्वाची भूमिका बजावतात. आज आम्ही आपणास असे काही कपड्यांची माहिती देत आहोत की ते परिधान केल्यानंतर आपण अधिक तरूण दिसाल.
* अँकल लेंथ बूट
आपले वय कितीही असो, तरूण दिसण्यासाठी अॅँकल लेंथ बूट वापरु शकता. अँकलपासून काही इंच वर असलेले बूट घातल्यावर तुम्ही अधिक तरूण दिसाल.
* ओव्हरसाईझ स्वेटर
यूथफुल दिसण्यासाठी ओव्हरसाईझ कपडे खूप उपयुक्त ठरतात. शिवाय त्यात काळा रंग वापरल्यास आपल्या तारुण्यात अधिक भर पडते. प्रिंटेड लेगिंग, स्किनी जीन्स यांच्यासोबत वापरल्यास अधिकच रुबाबदार दिसाल.
* स्ट्रेची पॅन्ट
तरुण दिसण्यासाठी तुम्ही स्ट्रेट किंवा नॅरो लेग असलेली फ्लॅट फ्रंट पॅन्ट वापरु शकता. ही अगदी उत्तम चॉईस आहे.
* टी-शर्ट
वेळेअभावी आपण वरील कपड्यांचा वापर करु शकत नसाल तर टी-शर्ट उत्तम उपाय आहे. उन्हाळा सुरू झाला असून पांढरा, करडा, पिवळा अशा सॉफ्ट शेडचे टी-शर्ट ट्राय करू शकता.