जगातील विख्यात, यशस्वी उद्योजक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2016 05:39 IST2016-02-12T12:39:44+5:302016-02-12T05:39:44+5:30

साधारणत: उद्योजक किंवा यशस्वी लोकांबद्दल, त्यांनी यशाची शिडी कशी चढली याबद्दल उत्सुकता असते.

Famous, successful entrepreneurs from around the world | जगातील विख्यात, यशस्वी उद्योजक

जगातील विख्यात, यशस्वी उद्योजक

ong>साधारणत: उद्योजक किंवा यशस्वी लोकांबद्दल, त्यांनी यशाची शिडी कशी चढली याबद्दल उत्सुकता असते. जगभरात असे अनेक उद्योजक आहेत, जे आपल्या क्षेत्रात यशस्वी झाले आहेत. शेअर बाजार अथवा स्टॉक एक्स्चेंज यांचा विचार केला असता, असेच काही यशस्वी उद्योजकांची माहिती.



शॉन बेझॉस - अमेझॉन
शॉन बेझॉस हे अमेझॉन डॉट कॉमचे संस्थापक आणि प्रमुख आहेत. संकेतस्थळांच्या दुनियेत अमेझॉनचा दबदबा आहे. लोकांना आवडणाºया वस्तू पाठविण्यापूर्वी त्यावर संशोधन केले जाते आणि ते कशा पद्धतीने पोहोचविले जाईल, याचाही अभ्यास केला जातो. हा व्यवसाय कसा वाढेल, याच्या कल्पनेला प्राधान्य दिले जाते. 



अ‍ॅनी मुल्के  - झेरॉक्स
मंदीच्या काळात महिला अधिक सक्षमपणे काम करू शकत नाही, या भावनेला अ‍ॅनी यांनी तडा दिला. या संस्थेत त्या निव्वळ बॉस म्हणून काम करीत नाहीत. झेरॉक्सशी 2001 साली जोडल्या गेलेल्या अ‍ॅनी यांनी कंपनीत 30 टक्के वाढ केली. फोर्ब्स कंपनीने अ‍ॅनी यांना जगातील सर्वात कर्तृत्ववान महिला म्हणून 2005 आणि 2009 साली गौरविले होते.



ब्रॅड स्मिथ - इनट्यूट 
इनट्यूट हा जगातील मोठा आणि मुख्य सॉफ्टवेअर प्रोग्राम आहे. बाजारातील मोठा वाटा हा इनट्यूटचा आहे. ब्रॅड यांनी आपल्या आठ हजार कर्मचाºयांना यात काम करताना येणारे धोकेही सांगितले आहेत. मोठी झेप घेताना मागेही पडू शकतो याचेही भान त्यांनी दाखविले आहे. 



होवार्ड शुल्टझ् - स्टारबक एसबीयुएक्स
होवार्ड यांनी अत्यंत धाडसी पावले उचलत कंपनीचा नफा 18  टक्क्यांवर वाढविला. स्वत: पुढे जात असताना इतरांकडून काही चांगले शिकण्याची त्यांची जिद्द आहे. त्यांच्या याच विश्वासाने कंपनीने मोठी प्रगती केली. 



इंद्रा नुयी - पेप्सीको
जगभरातील 100 कर्तृत्ववान महिलांमध्ये समावेश असणाºया इंद्रा नुयी यांनी पेप्सिको कंपनीला योग्य वळणावर नेले. जंक फुड्समध्ये चांगल्या प्रकारे खाद्यपदार्थ देण्याकडे त्यांचा कल राहिला. जुन्या व्यावसायिकांप्रमाणे त्यांनी काम केले. 



वॉरेन बुफेट - बर्कशायर हाथवे
गुंतवणुकदारांना विश्वास देणारे नाव म्हणून वॉरेन बुफेट यांचा उल्लेख केला जातो. त्यांनी पारंपारिक पद्धतीने सर्वांना अधिकाधिक गुंतवणूक करण्याचा नवा पायंडाच घालून दिला आहे. निरंतरता व धैर्य हे त्यांच्या व्यवसायाचे प्रमुख अस्त्र आहे. साधी राहणीमान हे देखील त्याच्या व्यवसायासाठी फायदेशीर ठरले. 



रिक ब्रॉनसन - व्हर्जिन 
व्हर्जिन मोबाईल माहिती नाही असा व्यक्ती सापडने कठीण आहे. केवळ मोबाईलच नव्हे तर अशा 100 हून अधिक व्यवसायात ते आहेत. आपल्या जीवनशैलीतून त्यांनी आपल्या ब्रॅण्डला नवी उंची प्रदान केली आहे. नाविण्याचा शोध घेणे हेच ब्रॉनसन यांचे वैशिष्ठ्य म्हणावे लागेल. 

Web Title: Famous, successful entrepreneurs from around the world

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.