​प्रसिद्ध समालोचक टोनी कोझिएर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2016 19:26 IST2016-05-12T13:56:42+5:302016-05-12T19:26:42+5:30

प्रसिद्ध समालोचक टोनी कोझिएर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले.

Famous commentator Tony Kozier dies | ​प्रसिद्ध समालोचक टोनी कोझिएर यांचे निधन

​प्रसिद्ध समालोचक टोनी कोझिएर यांचे निधन

ेस्ट इंडिज क्रिकेटचा आवाज’ म्हणून ओळखले जाणारे प्रसिद्ध समालोचक टोनी कोझिएर यांचे वयाच्या 75 व्या वर्षी निधन झाले.

दीर्घकाळ आजाराने त्रस्त असलेल्या टोनींसाठी क्रिकेट म्हणजेच जीव की प्राण होता. मान व पायाच्या संसर्गामुळे त्यांना 3 मे रोजी दवाखान्यात भरती करणयात आले होते.

सत्तरच्या दशकापासून वेस्ट इंडिज क्रिकेट संघाच्या जवळपास सर्वच क्रि केट सिरिजचे समालोचन टोनी यांनी आपल्या खास शैलीमध्ये केले आहे.

एक उत्कृष्ट समालोचक, क्रिकेट समीक्षक, लेखक आणि क्रिकेट इतिहासतज्ञ म्हणूनही त्यांना ओळखले जाते. त्यांचे वडील जिमीदेखील क्रिकेट लेखक होते.

1965 साली त्यांनी आॅस्ट्रेलियाच्या वेस्ट इंडिज टूरपासून समालोचक म्हणून सुरुवात केली. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण क्रिकेटविश्वात शोककळा पसरली आहे.

कॅरिबिअन प्रीमियर लीगचे सीईओ डेमियन ओडोनोहोई म्हणाले, टोनी यांच्या जाण्यामुळे खरंच खूप दु:ख झाले आहे. वेस्ट इंडिज क्रिकेटच्या सुवर्णकाळाचे ते साक्षीदार होते. त्यांच्या आवाजाने चाहत्यांमध्ये क्रिकेटविषयी सकारात्मक विश्वास निर्माण व्हायचा.

अनेक खेळाडंूनी ट्विटरवर श्राद्धांजली दिली. इंग्लंडचा पूर्व कॅप्टन मायकल वॉनने लिहिले की, माझ्यामध्ये वेस्ट इंडिज क्रिकेटविषयी आवड निर्माण करण्यासाठी टोनी कोझियर कारणीभूत होते. त्यांच्या निधनामुळे खूप दु:ख झाले.  

Web Title: Famous commentator Tony Kozier dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.