Be like Leo. Help girls change the world: bit.ly/1OmL0Tp
Posted by Girl Scout Cookies on Monday, March 7, 2016
लिओच्या नावाने भन्नाट मार्केटिंग
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 04:26 IST
न्यूयॉर्क गर्ल स्काऊटच्या एका तुकडीने लिओच्या फोटोचा वापर करून भन्नाट मार्केटिंग आयडिया अंमलात आणली.
लिओच्या नावाने भन्नाट मार्केटिंग
गेल्या महिन्यात अखरे लिओनार्दो डिकॅप्रिओला (आपला लाडका लिओ!) आॅस्कर मिळाला आणि त्याच्या चाहत्यांनी सुटकेचा श्वास घेतला.पण त्या आधी लिओने आॅस्कर पुरस्कार सोहळ्यात ‘गर्ल स्काऊट कुकिज्’ विकत घेतले होते. आणि कुकीकडे पाहून लिओच्या तोंडाला सुटलेले पाणी संपूर्ण जगाने पाहिले.इंटरनेटवर हा फोटो चांगलाच व्हायरल झाला. न्यूयॉर्क गर्ल स्काऊटच्या एका तुकडीने या फोटोचा वापर करून भन्नाट मार्केटिंग आयडिया अंमलात आणली.लोकांना ‘गर्ल स्काऊट कुकिज्’ विकत घेण्यासाठी आकर्षित करण्यासाठी त्यांनी ‘कुकिज्’कडे पाहून ओठांवर जीभ फिरवणाऱ्या लिओच्या फोटोखाली लिहिले की, ‘हा लिओ आहे. लिओला आॅस्क र हवाय. लिओने शोमध्ये ‘गर्ल स्काऊट कुकिज्’ विकत घेतले. लिओने आॅस्कर जिंकला. लिओ स्मार्ट आहे. तुम्हीदेखील लिओसारखे स्मार्ट होऊन ‘गर्ल स्काऊट कुकिज्’ खरेदी करा.’गर्ल स्काऊटची ही आयडिया चांगलीच यशस्वी ठरली. त्यांनी सांगितले की, ‘लिओचा हा फोटो पाहून लोक आमच्या टेबलपाशी साईनबोर्ड वाचण्यासाठी येतात. लोकांना आमची आयडिया आवडल्यामुळे ते आनंतदाने कुकीज् विकत घेतात.’ वाह भाई!