फेसबुकचा १२वा वाढदिवस ‘फ्रेंड्स डे’ म्हणून साजरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2016 08:54 IST2016-02-05T03:24:10+5:302016-02-05T08:54:10+5:30

बघता बघता फेसबुक नावाचे वादळ सुरू होऊन 12 वर्षे झाली. गंमतीगंमतीमध्ये सुरू झालेला फेसबुकने

Facebook's 12th birthday is celebrated as 'Friends Day' | फेसबुकचा १२वा वाढदिवस ‘फ्रेंड्स डे’ म्हणून साजरा

फेसबुकचा १२वा वाढदिवस ‘फ्रेंड्स डे’ म्हणून साजरा

ता बघता फेसबुक नावाचे वादळ सुरू होऊन 12 वर्षे झाली. गंमतीगंमतीमध्ये सुरू झालेला फेसबुकने कधी संपूर्ण जगाला वेड लागले हे कळालेच नाही. प्रेयसीवर राग काढण्याच्या हेतून सुरू झालेला या प्रवासाने मार्क झुकेरबर्गला सर्वांच्या ओठांवरचे नाव बनवले. संपूर्ण जगातील लोकांन एकत्र जोडण्याचा ध्यास घेतलेल्या फेसबुकने आपला 12 वा वर्धापन दिन ‘फे्रंड्स डे’ म्हणून साजरा करण्याचे ठरवले आहे. आपल्या दीडशे कोटींपेक्षा जास्त यूजर्सना कंपनीने एका स्पेशल गिफ्ट दिले आहे.
आपण आतापर्यंत फेसबुकवर अपलोड केलेल्या फोटोंना एकत्र करून फेसबुकने एक व्हिडियो कोलाज तयार केला आहे. आपण टॅग असलेले, मित्रांनी टाकलेले फोटो असे सर्वच फोटो एका अ‍ॅटोमॅटीक टेक्नोलॉजीने निवडून हा कोलाज बनवला आहे. आतापर्यंतचा आपल्या मैत्रीचा प्रवास यातून दाखविण्यात आला आहे. यातील फोटो तुम्ही डिलिट करून त्याजागी तुम्हाला हवे असलेले फोटो टाकू शकता. तुमच्या मित्रांना तो शेअरही करून शकता.
हार्वड विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्ये सर्वप्रथम फेसबुकची सुरूवात झाली होती. ब्रेक-अप झाले म्हणून गर्लफे्रंडवर रागावलेल्या मार्कने कॉलेजमधील सर्व मुलींचे फोटो सर्व्हरवरून हॅक करून मिळवले आणि ते एका प्रोग्राममध्ये अपलोड करून सर्व मुलांना फोटो पाहून कोण सुंदर, कोण नाही असे कमेंट करण्यास सांगितले. त्यातूनच त्याला फेसबुकची कल्पना सुचली.

Web Title: Facebook's 12th birthday is celebrated as 'Friends Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.