फेसबुक ने केली टी20 वर्ल्ड कपची तयारी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2016 06:12 IST
फेसबुकने प्रोफाईल फोटोला संघाला पाठिंबा देण्यासाठी सर्पोट टीम फीचर अॅड के ले आहे.
फेसबुक ने केली टी20 वर्ल्ड कपची तयारी
आंतरराष्ट्रीय क्रिकेट महासंघाच्या (आयसीसी) वतीने भारतात टी20 वर्ल्डकपचे आयोजन करण्यात आले आहे. 9 मार्च पासून आसीसी टी20 वर्ल्डकपच्या पात्रता फेरीला सुरुवात झाली आहे. क्रिकेटचे सर्वाधिक चाहते भारतात आहेत. यासोबतच फेसबुक माहिती नसणारा भारतीय शोधणे कठीण आहे. या लोकप्रिय खेळाचा अधिकधिक रोमांच मिळविता यावा यासाठी फेसबुकने आयसीसीशी करार करून काही फीचर्स अॅड केले आहेत. फेसबुकने प्रोफाईल फोटोला संघाला पाठिंबा देण्यासाठी सर्पोट टीम फीचर अॅड के ले आहे. यात आवडत्या संघाला पाठिंबा दर्शविता येतो. युजर्सच्या प्रोफाईलवर ज्या संघाला पाठिंना दर्शविला आहे त्याचा लोगो फोटोच्या खालच्या भागात दिसतो. या शिवाय अनेक नवे फीचर्स आहेत. ज्यात षटकार लगावल्यावर दाखविणारा आनंद, शुन्यावर बाद झालेला डक, टीम सर्पोट, कॅच, आऊट, व्हिक्टरी साईन दाखविणारा खेळाडू हे इमोजी तयार करण्यात आले आहेत.फेसबुक लाईव्ह ही आॅनलाईन व्हिडीओ स्ट्रीमिग सेवा देखील सुरू करण्यात आली आहे. क्रिकेट चाहत्यांचा आनंद यामुळे द्विगुणित होणार हे नक्की...