​इंग्लंडच्या पंतप्रधानांनी पत्नीला दिली ‘सेकंड हँड कार’ गिफ्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2016 20:36 IST2016-05-24T15:06:47+5:302016-05-24T20:36:47+5:30

पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी दीड हजार पौंडमध्ये (1.47 लाख रु.) एक जुनी कार विकत घेतली आहे.

England's Prime Minister gave a 'Second Hand Car' gift to the wife | ​इंग्लंडच्या पंतप्रधानांनी पत्नीला दिली ‘सेकंड हँड कार’ गिफ्ट

​इंग्लंडच्या पंतप्रधानांनी पत्नीला दिली ‘सेकंड हँड कार’ गिफ्ट

कावे ते नवलच’ या प्रकारातील ही गोष्ट आहे. आपल्याकडे राजकारणी म्हटले की, महागड्या गाड्या, आलिशान घरे ओघाने आलेच.

माणूस जेवढ्या मोठ्या गाडीतून फिरतो, तेवढी त्याची समाजात पत जास्त असा साधारण समज आपल्याकडे आहे. मंत्र्यासोबत त्याचे नातेवाईकही याचा फायदा घेतात.

त्यामुळे जर स्वत: इंग्लंडचे पंतप्रधान पत्नीला भेट म्हणून ‘सेकंड हँड’ गाडी घेत असतील तर आश्चर्याचीच बाब आहे, नाही का?

पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी दीड हजार पौंडमध्ये (1.47 लाख रु.) एक जुनी कार विकत घेतली आहे. ज्या सेल्समनकडून ही कार खरेदी करण्यात आली त्याने माहिती दिली की, पंतप्रधानाच्या कार्यालयातून जेव्हा याबाबत विचारणा झाली तेव्हा मला वाटले हा प्रँक कॉल आहे. माझे मित्र माझी मजा घेत आहेत.

कॅमेरून जेव्हा कार घेण्यासाठी त्याच्याकडे आले तेव्हा कारचा मागचे ब्रेक लाईट चेक करण्यासाठी त्यांनी एका सुरक्षा रक्षकाला गाडी मागे उभे केले. निळ्या रंगाची ही कार त्यांना खुपच आवडली.

पंतप्रधान असलेला व्यक्ती अगदी सामान्य व्यक्तीप्रमाणे कार खरेदी करण्यासाठी येतो या गोष्टीने तो सेल्समन, ईएन हॅरीस, फारच भारावला. 

तो म्हणतो, या गोष्टीवर विश्वास ठेवणे जरा अवघड आहे परंतु ते पंतप्रधान जरी असले तरी एखाद्या सामान्य व्यक्तीप्रमाणेच ते राहतात. इतर कोणत्याही व्यक्तीप्रमाणे आपल्या पत्नीला भेट म्हणून त्यांनी सेकंड हँड कार विकत घेतली.

Web Title: England's Prime Minister gave a 'Second Hand Car' gift to the wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.