प्रिजन ब्रेकमध्ये एंडेलस्टीनचे पुर्नरागमन
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2016 21:58 IST
टीव्ही मालिका ‘प्रिजन ब्रेक’मध्ये पॉल केलरमनची भूमिका निभावलेला अभिनेता पॉल एंडेलस्टीन आगामी मालिकेत पुन्हा बघावयास मिळणार आहे.
प्रिजन ब्रेकमध्ये एंडेलस्टीनचे पुर्नरागमन
टीव्ही मालिका ‘प्रिजन ब्रेक’मध्ये पॉल केलरमनची भूमिका निभावलेला अभिनेता पॉल एंडेलस्टीन आगामी मालिकेत पुन्हा बघावयास मिळणार आहे. या मालिकेचे प्रसारण २००५ ते २००९ दरम्यान झाले होते. पॉल एंडेलस्टीन मालिकेतील वेंटवर्थ मिलर (माइकल स्कोफिल्ड), डोमिनिक परसेल (लिंकन बरोज), सारा वेन कॅलीज (डॉ सारा टॅनक्रेडी), रॉबर्ट नेप्पर (टी-बॅँग) अमाउरी नोलास्को (सुक्रे) आणि रॉक्मोंड दुंबर (सी-नोट) या जुन्याच स्टार्ससमवेत पुर्नरागमन करणार आहे. एडेलस्टीनने ‘प्राइवेट प्रॅक्टिस आणि स्कॅँडल’ या मालिकांमध्ये काम केले आहे. प्रिजन ब्रेकचा प्रीमियर २०१६-१७ मध्ये होणार आहे. मात्र अजुनपर्यंत प्रीमियरची तारखेची घोषणा केली गेली नाही.