भावना व्यक्त करणारे इमोजी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2016 05:28 IST2016-02-28T12:28:06+5:302016-02-28T05:28:06+5:30
इमोजी आल्याने बोलण्याची स्टाईलच बदलली. हळूहळू दोन शब्दांच्या मधे किंवा वाक्याच्या शेवटी इमोजी टाकण्याची स्टाईल आली.

भावना व्यक्त करणारे इमोजी
मात्र इमोजी आल्याने बोलण्याची स्टाईलच बदलली. हळूहळू दोन शब्दांच्या मधे किंवा वाक्याच्या शेवटी इमोजी टाकण्याची स्टाईल आली. यामुळे कंटाळवाणे वाटणारे बोलणे मजेशीर होत गेले. आता तर शब्दात उत्तरे देण्यापेक्षा सगळे या इमोजीमध्ये उत्तर देतात. चॅटिंग करणाºया अनेक लोकांना शब्दापेक्षाही हे इमोजी अधिक जवळचे वाटतात.
या इमोजीमुळे एक नवीन भाषाच अस्तित्वात आली असेही अनेक अभ्यासक म्हणतात, संवाद साधण्याची ही नवी स्टाईल आपल्याला अधिक जवळची का वाटते याचेंच उत्तर शोधण्याचा प्रयत्न परदेशात झाला. इमोजी टाकले की आपल्याला त्याच्या बोलण्याचा किमान उद्देश तरी किंवा समोरच्या व्यक्तीचा मूड तरी कळतो.