एल्टर आणि रोलिंग दानशुर सेलिब्रेटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2016 16:53 IST2016-04-19T11:23:42+5:302016-04-19T16:53:42+5:30

ब्रिटेनच्या दानवीरांच्या यादीत प्रसिद्ध गायक-गीतकार एल्टन जॉन आणि कादंबरी लेखिका जे. के. रोलिंग सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांनी २०१५ मध्ये लाखो डॉलर दान केले आहेत. 

Elter and Rolling Donation Celebrate | एल्टर आणि रोलिंग दानशुर सेलिब्रेटी

एल्टर आणि रोलिंग दानशुर सेलिब्रेटी

रिटेनच्या दानवीरांच्या यादीत प्रसिद्ध गायक-गीतकार एल्टन जॉन आणि कादंबरी लेखिका जे. के. रोलिंग सर्वोच्च स्थानी आहेत. त्यांनी २०१५ मध्ये लाखो डॉलर दान केले आहेत. समाचार पत्रानुसार एल्टन जॉनने २०१५ मध्ये ब्रिटन आणि अमेरिका स्थित स्वत:च्या एल्टन जॉन एड्स फाउंडेशनसहीत विभिन्न कार्यासाठी २.६८ कोटी पाउंड (जवळपास ३.८ कोटी डॉलर) दान केले आहेत. तर हॅरी पॉटरची लेखिका जे. के. रोलिंग हिने लुमोस फाउंहेशन आणि वोलन्ट चॅरिटेबल ट्रस्टला जवळपास १.४ कोटी डॉलर दान केले आहेत. माजी फुटबॉलपटू डेविड बेकहमने देखील या यादीत स्थान मिळविले आहे. त्याने जवळपास ७० लाख डॉलर दान केले आहेत. तसेच या यादीत ब्रायन मे, रोजर टायलर, शेफ जॅमी ओलिवर आणि प्रसिद्ध रॉक बॅँड ‘वन डायरेक्शन’ सुद्धा सहभागी आहेत.

Web Title: Elter and Rolling Donation Celebrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.