एडलेचे ‘हॅलो’ तुफानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 11:10 IST2016-01-16T01:14:58+5:302016-02-07T11:10:51+5:30

ब्रिटिश सिंगर एडले हिचे कमबॅक भलतेच यशस्वी ठरले आहे. 

Edley's 'Hello' Tuffany | एडलेचे ‘हॅलो’ तुफानी

एडलेचे ‘हॅलो’ तुफानी

रिटिश सिंगर एडले हिचे कमबॅक भलतेच यशस्वी ठरले आहे. तिच्या हॅलो या गाण्याने नवा विक्रम नोंदवला आहे. एका आठवड्यात हे गाणे तब्बल अकरा लाखांपेक्षा जास्त लोकांनी डाऊनलोड केले.

बिलबोर्ड चार्टवर एक आठवड्यात दहा लाखांचा टप्पा ओलांडणारे हे पहिलेच गाणे ठरले आहे. या यशाबरोबरच एडलेने जस्टिन बीबरलादेखील मागे टाकले. त्याचे सॉरी हे गाणे एक आठवड्यात सुमारे तीन लाख लोकांनी डाऊनलोड केले होते.

हॅलो हे गाणे एडलेच्या 25 या आगामी अल्बममधील असून या महिन्यात तो रिलीज होणार आहे. याआधी तिच्या चार वर्षांपूर्वीच्या 21 या अल्बमने तुफानी यश मिळवताना सहा ग्रॅमी अवॉर्ड जिंकले होते.

या अल्बमच्या तब्बल 30 लाख कॉपीज विकल्या गेल्या होत्या.

Web Title: Edley's 'Hello' Tuffany

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.