‘ई-सिगरेट’ ओढणे पडले महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2016 04:54 IST2016-02-27T11:54:55+5:302016-02-27T04:54:55+5:30

ब्रिटेनमधील एका तरुणाला ई-सिगारेट ओढणे चांगलेच महागात पडले. ही सिगारेट पीत असताना अचानक झालेल्या स्फोटात या युवकाला आपले दात गमवावे लागले,

The e-cigarette was pulled down in the costly | ‘ई-सिगरेट’ ओढणे पडले महागात

‘ई-सिगरेट’ ओढणे पडले महागात

ong>युवकांमध्ये धुम्रपान करणे फॅ शन झाली आहे. मात्र तंबाखूची सवय लागू नये यासाठी ई-सिगरेटचे चलन वाढू लागले आहे. मात्र ब्रिटेनमधील एका तरुणाला ई-सिगारेट ओढणे चांगलेच महागात पडले. ही सिगारेट पीत असताना अचानक झालेल्या स्फोटात या युवकाला आपले दात गमवावे लागले, तसेच त्याचे तोंडही भाजून निघाले.

त्या युवकाला ही सिगारेट त्याच्या मित्राने दिली होती. यावेळी झालेल्या स्फोटामुळे त्या युवकाच्या बेडरुमलाही आग लागली. त्यानंतर त्याला शहरातील प्रिन्सेस रॉयल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्या युवकाचे तीन दात पडले, तसेच त्याचा चेहरा, हात आणि मनगटही भाजल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

ब्रिटेनमधील युवकांत मागील काही दिवसांत ईलेक्ट्रॉनिक सिगरेट ओढण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे शहरातील विविध दुकानांत ई-सिगरेटची विक्री वाढली आहे. मात्र ई-सिगरेटचा स्फोट झाल्याची ब्रिटनमध्ये घडलेली अशाप्रकारची ही पहिलीच घटना आहे.

Web Title: The e-cigarette was pulled down in the costly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.