ड्वेन जॉन्सनची लिटिल एंजल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 04:03 IST2016-01-16T01:08:04+5:302016-02-13T04:03:15+5:30

ड्वेन जॉन्सनची गर्लफ्रेंड लॉरेन हाशियान हिने मागील आठवड्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे.

Dwayne Johnson Little Angel! | ड्वेन जॉन्सनची लिटिल एंजल!

ड्वेन जॉन्सनची लिटिल एंजल!

लिवूडमधील लोकप्रिय स्टार ड्वेन जॉन्सन सध्या प्रचंड आनंदात आहे. त्याला कारणही तसेच आहे.

त्याची गर्लफ्रेंड लॉरेन हाशियान हिने मागील आठवड्यात एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. ड्वेनने इन्स्टाग्रामवर आपल्या मुलीसह काढलेला फोटो छानशा टॅगलाईनसह शेअर केलाय.. ''Christmas came early!''

ड्वेनने आपल्या लिटिल एंजलचे नाव जास्मीन ठेवले आहे.

''जास्मीन जन्माला आल्यानंतर काही मिनिटांनी मी तिला जवळ घेतले. त्यावेळच्या भावना शब्दांत व्यक्त करणे अशक्य आहे. मुलीचा बाप बनल्यानंतर आयुष्याला नवा अर्थ प्राप्त होतो, हे मला पूर्णपणे पटलेय. देवाने मला पूर्वीपेक्षा अधिक चांगला माणूस बनवावे, जेणेकरून मी स्वत:ला चांगला वडील म्हणून सिद्ध करू शकेल, अशी माझी प्रार्थना आहे,'' असे 'फास्ट अँण्ड फ्युरियस' फेम ड्वेनने नमूद केले. ड्वेनला पहिली पत्नी डॅनी गार्सिया हिच्यापासून १४ वर्षांची मुलगी आहे.

Web Title: Dwayne Johnson Little Angel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.