नोकरी मिळविण्यात कमी पडताय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2016 17:36 IST2016-12-18T17:36:13+5:302016-12-18T17:36:13+5:30
सध्या नोकरी मिळविणे म्हणजे तारेवरची कसरतच होय. बऱ्याचदा मुलाखत देऊनही आपल्याला काही कारणास्तव नोकरी मिळत नाही.

नोकरी मिळविण्यात कमी पडताय?
परिपूर्ण रिज्युमे
नोकरी मिळविण्यासाठी आपला रिज्युमे हा परिपूर्ण व आकर्षक असावा. त्यात बिनकामाची माहिती देऊ नका. सर्वात वरती कामाचा अनुभव आणि त्यानंतर बाकिच्या गोष्टी लिहा.
पर्यायी नोकरी असू द्या
बऱ्याचदा आपल्या मनासारखी नोकरी मिळत नाही, पण तुम्हाला ज्या क्षेत्रात नोकरी करायची आहे, तोपर्यंत पर्याय म्हणून त्याच्याशी निगडीत कंपन्यांचा शोध घेऊन पर्यायी नोकरी करु शकता.
तुमची बलस्थाने ओळखा
नोकरी शोधायच्या अगोदर तुमची बलस्थाने ओळखा आणि तुम्हाला नोकरी देणाऱ्या कंपनीला काय हवे याची माहिती ठेवा म्हणजे मुलाखतीच्या वेळी तुम्हाला मदत होईल.
संभाषण वाढवा
सामाजिक माध्यमांच्या वेबसाइटवर सक्रिय राहा, नवीन माणसांना भेटा, जॉब पोर्टलवर तुमची नोंदणी करा. नोकरीविषयी तुमच्या अपेक्षा स्पष्टपणे सांगा. ई-मेल किंवा फोन न करता लोकांना प्रत्यक्ष भेटा, असे केल्याने तुमचा समोरच्यावर चांगला प्रभाव पडतो.