डॉलीने केले श्वेताच्या आईचे रडणे रेकॉर्ड
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2016 20:12 IST2016-04-03T03:12:24+5:302016-04-02T20:12:24+5:30
प्रत्युषाच्या आईसोबत फोनवर झालेले संभाषण डॉलीने रेकॉर्ड केले.

डॉलीने केले श्वेताच्या आईचे रडणे रेकॉर्ड
स ्व मनोरंजन विश्वात खळबळ माजवणाºया प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरण सध्या वेगवेगळे वळण घेत आहे. ‘बालिका वधू’ अभिनेत्रीने आत्महत्या केली की तिची हत्या करण्यात आली याचादेखील पोलिस तपास घेत आहेत. तिच्या मृत्युमुळे प्रत्युषाचे कुटुंबिय पूर्णपणे खचून गेले आहेत.
प्रत्युषाचा जाण्याने टेलिव्हिजन दुनियेत हळहळ व्यक्त केली जात असताना टीव्हीवरील वादग्रस्त डॉली बिंद्राने पुन्हा एकदा एका नव्या वादाला तोंडे फोडले आहे.
प्रत्युषाच्या मृत्युनंतर तिच्या आईसोबत फोनवर झालेले संभाषण डॉलीने रेकॉर्ड केले. ही रेकॉर्डिंग सोशल मीडियावर झपाट्याने व्हायरल झाली. या रेकॉर्डिंगमध्ये प्रत्युषाची आई मुलीच्या दु:खात असहाय्य होऊन रडत आहे.
डॉलीच्या अशा बेजबाबदार आणि असंवेदनशील वर्तनामुळे नेटीझन्सचा रोष तिने ओढावून घेतला आहे. फेसबुक, ट्विटरवर तिच्या या कृत्याचा धिक्कार करणारे मेसेजेस पोस्ट केले जाऊ लागले.
एकाने लिहिले की, प्रसिद्धीसाठी हापापलेले डॉली बिंद्रासारखे लोक कोणाच्या मृत्यूलादेखील स्वत:चा पब्लिसिटी इव्हेंट बनवू शकतात, ही बाब फार दु:खद आहे.