​ बीबीसीची जॉन पॉल यांच्यावर डॉक्युमेंट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 04:19 IST2016-02-16T11:19:40+5:302016-02-16T04:19:40+5:30

येत्या सोमवारी डॉक्युेमेंट्री प्रसिद्ध करणार

Documentary on BBC's John Paul | ​ बीबीसीची जॉन पॉल यांच्यावर डॉक्युमेंट्री

​ बीबीसीची जॉन पॉल यांच्यावर डॉक्युमेंट्री


/>दिवंगत पोप जॉन पॉल द्वितीय यांच्यावर बीबीसी येत्या सोमवारी डॉक्युेमेंट्री प्रसिद्ध करणार आहे. ते १९७८ ते २००५ या काळात पोप होते. २ एप्रिल २००५ या दिवशी वयाच्या ८५ व्या वर्षी पोप जॉन पॉल यांचे निधन झाले. कॅथेलिक चर्चने मृत्यूनंतर त्यांना संतपद बहाल करण्याचा निर्णय घेतला होता. अशा या पोप जॉन पॉल यांच्याबाबत बीबीसीने आपल्या डॉक्युमेंट्रीत काही गोष्टींचा उल्लेख केला आहे. अ‍ॅना टेरेसा तैमेनिका या पोलंडमधील लेखिकेशी त्यांचा पत्रव्यवहार झाला होता. ही पत्रे पोलंडच्या नॅशनल लायब्ररीत आहेत, अशी माहिती ही डॉक्युमेंट्री तयार करणारे बीबीसीचे वरिष्ठ पत्रकार एडवर्ड स्टॉर्टन यांनी दिली आहे. 

Web Title: Documentary on BBC's John Paul