​44 वर्षानंतर आई होणे नकोच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2016 20:12 IST2016-05-06T14:42:23+5:302016-05-06T20:12:23+5:30

एका सर्वेक्षणात असे दिसून आले की, ब्रिटिश महिला वयाच्या 44 व्या वर्षानंतर आई होऊ नये या मताच्या आहेत.

Do not want to be a mother after 44 years! | ​44 वर्षानंतर आई होणे नकोच!

​44 वर्षानंतर आई होणे नकोच!

होणे स्त्रीच्या जीवनातील सर्वात आनंदाचा क्षण असतो. पण, इंग्लंडमधील महिलांनी आई होण्यासाठी एक वेगळीच सीमा आखली आहे.

एका सर्वेक्षणात असे दिसून आले की, ब्रिटिश महिला वयाच्या 44 व्या वर्षानंतर आई होऊ नये या मताच्या आहेत. ‘प्राईव्हेट प्रेग्नन्सी यूके शो’साठी घेण्यात आलेल्या या सर्व्हेमध्ये महिलांनी सांगितले की, पन्नाशीनंतर महिलांना गर्भवती राहण्यासाठीची वैद्यकीय मदत देऊ नये.

म्हातारे पालक असणे मुलांवर अन्याय आहे. चारपैकी तीन महिलांचे हेच मत आहे. महिलांना आई होण्याची योग्य वेळ कोणती आहे याबाबत शिक्षण व माहिती दिली जात नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे.

44 वयानंतर आई न होण्याची अनेक कारणे महिलांनी सांगितली. एक तर मुलांचे म्हातारे पालक होणे चांगले नाही. दुसरे म्हणजे अधिक प्रौढ वयात जन्मलेल्या बाळाला ‘डॉन सिन्ड्रोम’सारख्या इतर समस्या होऊ शकतात.

तसेच मुलांची पूर्ण वाढ पाहण्याचे भाग्य पालकांना मिळेलच याची शक्यता नसते. डॉ. अमिन गॉर्जी यांनी माहिती दिली की, आई होण्याचे आदर्श वय म्हणजे 20 ते 30 वर्षे आहे. पस्तीशीनंतर आई होण्यची क्षमता घटण्यास सुरुवात होते. चाळीशीनंतर तो वेग आणखी वाढतो.

Web Title: Do not want to be a mother after 44 years!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.