प्रसिद्धीसाठी राष्ट्रगीताचा वापर नकोच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2016 04:57 IST2016-02-25T11:57:31+5:302016-02-25T04:57:31+5:30

प्रसिद्धीसाठी राष्ट्रगीताचा वापर नकोच! आपल्या प्रोडक्टच्या मार्केटिंगसाठी प्रत्येकच जण जाहिरतीचा आधार घेत असतो. बॉलिवूडही याला अपवाद नाही. परंतु अशी जाहिरात करताना काही गोष्टींचे भान ठेवायला हवे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. प्रकाश झा यांच्या जय गंगाजल या सिनेमाच्या जाहिरातीसाठीही अशीच घोडचूक करण्यात आली आहे. पोलीस दलातील महिलांना मानवंदना असे सांगत प्रियांका चोप्रा, स्वत: प्रकाश झा आणि पोलिसांच्या वेशातील अन्य असे सर्व मिळून राष्ट्रगीत आहेत, असे यात दाखविण्यात आले आहे.  राष्ट्रगीताचा आदर राखणे आणि ते सुरू असताना प्रत्येकानं उठून उभे राहणे हे आवश्यकच आहे. परंतु राष्ट्रगीताचा वापर गंगाजल या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी, प्रमोशनसाठी करावा का हा प्रश्न आहे. यावर सीएनएक्सने तरुणाईची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनीही या प्रकाराचा कडाडून विरोध केला.  राष्ट्रगीत संपल्यानंतर जय गंगाजल अशी चित्रपटाची जाहिरातही याच व्हिडियोमध्ये दाखविण्यात आली आहे. राष्ट्रगीताचा असा व्यावसायिक कारणासाठी वापर करणं योग्य नाही. प्रकाश झा प्रॉडक्शनने देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी हा चित्रपट तयार केलाय की त्यांना ही भावना त्यांच्या फायद्यासाठी कॅश करायची आहे, असा रोखठोक प्रश्नही या तरुणाईने यावेळी विचारला. ... ही तर गंभीर चूक जाहिरातीला विरोध नाही. परंतु कुठलीही जाहिरात करताना त्यातून वाद निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. राष्ट्रगीताबद्दल एक विशिष्ट नियमावली तयार करण्यात आली आहे. आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर करणे ही गंभीर चूक आहे. माझ्या मते झा यांनी प्रसिद्धपोटीच हा प्रकार केला असावा. त्यांनी त्वरित ही जाहिरात काढायला हवी.               - गुल्फशा कादरी जाहिरात लगेच बंद करायला हवी प्रत्येक भारतीयांसाठी राष्ट्रगीत हा अभिमानाचा विषय आहे. त्याचा वापर सिनेमाच्या प्रमोशनसाठी करणे योग्य नाही. कुणी याची दखल घेऊन दंडात्मक कारवाई करण्याआधी झा यांनी स्वत:हून ही जाहिरात मागे घ्यायला हवी. असे घडले नाही तर उद्या कुणीही उठेल अन् आपल्या प्रोडक्टच्या जाहिरातीसाठी राष्ट्रगीताचा वापर करेल. हे कुणी कसे खपवून घ्यायचे. - सुरभी पुरोहित कुणाची परवानगी घेतली? राष्ट्रगीताचा वापर कुठे करावा, कोणी करावा याचे काही नियम आणि संकेत आहेत. शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत वाजणे ही अभिमानाचीच गोष्ट आहे. परंतु खाजगी किंवा व्यावसायिक कामासाठी कुणी राष्ट्रगीताचा वापर करीत असेल तर त्याला विरोध व्हायलाच हवा. झा यांनी यासाठी कुणाची परवानगी घेतली ते स्पष्ट व्हायला हवे. राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.  - शुभांगी बोरीकर चित्रपटाच्या प्रदर्शनावरच बंदी घालायला पाहिजे  सिनेमाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर करण्यात येतोय आणि तरीही यावर अजून कोणीच काही बोलत नाही हे धक्कादायक आहे. कुठे गेल्या त्या संघटना ज्या देशाप्रती प्रेम असल्याचे मीडियाला सांगत असतात? ज्या गोष्टीला विरोध करायचा त्याला कुणी करीत नाही आणि भलत्याच गोष्टींवर आपले श्रम खर्च केले जातात. या जाहिरातीवरच नव्हे तर या चित्रपटाच्या प्रदर्शनावरच बंदी घालायला हवी.   - पुनित रावल थेट गुन्हाच दाखल करायला हवा   औरंगाबाद मध्ये २०१० साली महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पाच आणि एका अपक्ष नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच धरतीवर प्रकाश प्रकाश झा यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा. जेणेकरुन यापुढे कोणी राष्ट्रगीताचा असा अवमान करणार नाही. ही फार गंभीर बाब आहे. आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी व प्रसिध्दी मिळवण्यासाठी कुणी असे अजिबात करू नये.    - अनिकेत तेजवानी

Do not use national anthem for publicity! | प्रसिद्धीसाठी राष्ट्रगीताचा वापर नकोच!

प्रसिद्धीसाठी राष्ट्रगीताचा वापर नकोच!

रसिद्धीसाठी राष्ट्रगीताचा वापर नकोच!
आपल्या प्रोडक्टच्या मार्केटिंगसाठी प्रत्येकच जण जाहिरतीचा आधार घेत असतो. बॉलिवूडही याला अपवाद नाही. परंतु अशी जाहिरात करताना काही गोष्टींचे भान ठेवायला हवे. दुर्दैवाने तसे होताना दिसत नाही. प्रकाश झा यांच्या जय गंगाजल या सिनेमाच्या जाहिरातीसाठीही अशीच घोडचूक करण्यात आली आहे. पोलीस दलातील महिलांना मानवंदना असे सांगत प्रियांका चोप्रा, स्वत: प्रकाश झा आणि पोलिसांच्या वेशातील अन्य असे सर्व मिळून राष्ट्रगीत आहेत, असे यात दाखविण्यात आले आहे. 
राष्ट्रगीताचा आदर राखणे आणि ते सुरू असताना प्रत्येकानं उठून उभे राहणे हे आवश्यकच आहे. परंतु राष्ट्रगीताचा वापर गंगाजल या चित्रपटाच्या जाहिरातीसाठी, प्रमोशनसाठी करावा का हा प्रश्न आहे. यावर सीएनएक्सने तरुणाईची प्रतिक्रिया घेतली असता त्यांनीही या प्रकाराचा कडाडून विरोध केला. 

राष्ट्रगीत संपल्यानंतर जय गंगाजल अशी चित्रपटाची जाहिरातही याच व्हिडियोमध्ये दाखविण्यात आली आहे. राष्ट्रगीताचा असा व्यावसायिक कारणासाठी वापर करणं योग्य नाही. प्रकाश झा प्रॉडक्शनने देशभक्तीची भावना निर्माण करण्यासाठी हा चित्रपट तयार केलाय की त्यांना ही भावना त्यांच्या फायद्यासाठी कॅश करायची आहे, असा रोखठोक प्रश्नही या तरुणाईने यावेळी विचारला.

... ही तर गंभीर चूक

जाहिरातीला विरोध नाही. परंतु कुठलीही जाहिरात करताना त्यातून वाद निर्माण होऊ नये, याची काळजी घेणे गरजेचे आहे. राष्ट्रगीताबद्दल एक विशिष्ट नियमावली तयार करण्यात आली आहे. आपल्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर करणे ही गंभीर चूक आहे. माझ्या मते झा यांनी प्रसिद्धपोटीच हा प्रकार केला असावा. त्यांनी त्वरित ही जाहिरात काढायला हवी.               - गुल्फशा कादरी

जाहिरात लगेच बंद करायला हवी

प्रत्येक भारतीयांसाठी राष्ट्रगीत हा अभिमानाचा विषय आहे. त्याचा वापर सिनेमाच्या प्रमोशनसाठी करणे योग्य नाही. कुणी याची दखल घेऊन दंडात्मक कारवाई करण्याआधी झा यांनी स्वत:हून ही जाहिरात मागे घ्यायला हवी. असे घडले नाही तर उद्या कुणीही उठेल अन् आपल्या प्रोडक्टच्या जाहिरातीसाठी राष्ट्रगीताचा वापर करेल. हे कुणी कसे खपवून घ्यायचे. - सुरभी पुरोहित

कुणाची परवानगी घेतली?
राष्ट्रगीताचा वापर कुठे करावा, कोणी करावा याचे काही नियम आणि संकेत आहेत. शाळा, महाविद्यालय, शासकीय कार्यक्रमांमध्ये राष्ट्रगीत वाजणे ही अभिमानाचीच गोष्ट आहे. परंतु खाजगी किंवा व्यावसायिक कामासाठी कुणी राष्ट्रगीताचा वापर करीत असेल तर त्याला विरोध व्हायलाच हवा. झा यांनी यासाठी कुणाची परवानगी घेतली ते स्पष्ट व्हायला हवे. राष्ट्रगीताचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी.  - शुभांगी बोरीकर

चित्रपटाच्या प्रदर्शनावरच बंदी घालायला पाहिजे

 सिनेमाच्या प्रमोशनसाठी राष्ट्रगीताचा वापर करण्यात येतोय आणि तरीही यावर अजून कोणीच काही बोलत नाही हे धक्कादायक आहे. कुठे गेल्या त्या संघटना ज्या देशाप्रती प्रेम असल्याचे मीडियाला सांगत असतात? ज्या गोष्टीला विरोध करायचा त्याला कुणी करीत नाही आणि भलत्याच गोष्टींवर आपले श्रम खर्च केले जातात. या जाहिरातीवरच नव्हे तर या चित्रपटाच्या प्रदर्शनावरच बंदी घालायला हवी.   - पुनित रावल

थेट गुन्हाच दाखल करायला हवा
 
औरंगाबाद मध्ये २०१० साली महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी शिवसेनेच्या पाच आणि एका अपक्ष नगरसेवकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच धरतीवर प्रकाश प्रकाश झा यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात यावा. जेणेकरुन यापुढे कोणी राष्ट्रगीताचा असा अवमान करणार नाही. ही फार गंभीर बाब आहे. आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी व प्रसिध्दी मिळवण्यासाठी कुणी असे अजिबात करू नये.    - अनिकेत तेजवानी

Web Title: Do not use national anthem for publicity!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.