​उपाशीपोटी निर्णय कधीच घेऊ नका

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 21:25 IST2016-05-11T15:55:42+5:302016-05-11T21:25:42+5:30

आपली भूक वाढवणारे हार्मोन्स (संप्रेरक) आपल्या निर्णय घेणाच्या क्षमेतवर नकारात्म परिणाम करत असतात.

Do not take a decision on hunger | ​उपाशीपोटी निर्णय कधीच घेऊ नका

​उपाशीपोटी निर्णय कधीच घेऊ नका

टात कावळे ओरडत असताना कोणत्याच गोष्टीत लक्ष लागणे शक्य नाही. ‘आधी पोटोबा’ उगीच नाही म्हणत. याला आता वैज्ञानिक आधारसुद्धा मिळाला आहे.

उपाशी पोटी महत्त्वाचा निर्णय घेऊ नका असा सल्ला वैज्ञानिक देत आहेत. आपली भूक वाढवणारे हार्मोन्स (संप्रेरक) आपल्या निर्णय घेणाच्या क्षमेतवर नकारात्म परिणाम करत असतात.

स्वीडनमधील गॉथेनबर्ग विद्यापीठातील कॅरोलिना स्किबका यांनी माहिती दिली की, घ्रेलिन नावाचे हार्मोन भूक वाढवत असतात. जेवणापूर्वी किंवा उपास असताना त्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते.

त्यामुळे आपला मेंदू घाईघाईने निर्णय घेतो. सारासार विचार न करता आपण एखाद्या निर्णयापर्यंत पोहचतो. याचे साधे उदाहरण म्हणजे जेव्हा भूक लागलेली असते तेव्हा मुख्य जेवण नंतर आहे हे माहीत असूनही स्नॅक्स खाण्याचा मोह आवरता येत नाही.

स्वयंस्फुर्ती किंवा भावनावशपणा हा एडीएचडी, ओसीडी, आॅटिजम् यांसारख्या अनेक न्युरोसाकियाट्रिक आजारांचे लक्षण आहे.  प्रयोगांतून असेदेखील दिसून आले की, घ्रेलीनची पातळी वाढली असता आपल्या मेंदूच्या संरचनेतही दुरगामी बदल होऊन अधीरपणा वाढतो.

उंदरांवर करण्यात आलेल्या प्रयोगांत जेव्हा त्यांच्या मेंदूमध्ये घ्रेलिनचे इंजेक्शन दिले तेव्हा ‘इम्पल्सिव्ह बिहेविएर’ वाढलेले दिसले.

Web Title: Do not take a decision on hunger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.