नारायण मूर्तीच्या मुलाचा घटस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2016 03:41 IST2016-01-16T01:13:22+5:302016-02-13T03:41:33+5:30

इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन आणि टीव्हीएस मोटर्सचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन ...

Divorce of a son of Narayana Puja | नारायण मूर्तीच्या मुलाचा घटस्फोट

नारायण मूर्तीच्या मुलाचा घटस्फोट

्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचा मुलगा रोहन आणि टीव्हीएस मोटर्सचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांची मुलगी लक्ष्मी वेणू यांनी 31 ऑक्टोबर रोजी घटस्फोट घेतला आहे. चेन्नईच्या कौटुंबिक न्यायालयाने त्यांना घटस्फोट मंजूर केला. रोहनचे शिक्षण कॉर्नेल आणि हॉवर्ड येथे तर लक्ष्मीचे शिक्षण येल येथे झाले. 2010 मध्ये त्यांची ओळख झाली आणि 2011 मध्ये ते चेन्नई येथे शानदार सोहळ्यात विवाहबद्ध झाले होते.

बंगळुरू येथे झालेला स्वागत समारंभ हा त्या वर्षातील त्या शहरातील सर्वांत मोठा समारंभ होता. रोहन आणि लक्ष्मी दोन वर्षांआधीच वेगळे झाले होते. याचवर्षी एप्रिलमध्ये त्यांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला होता. सप्टेंबर 2014 मध्ये लक्ष्मीच्या भावाचा म्हणजे सुदर्शनचा विवाह होता. या समारंभाला संपूर्ण मूर्ती कुटुंबीय अनुपस्थित होते. त्याचवेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

Web Title: Divorce of a son of Narayana Puja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.