देशात संशोधनाबद्दल अनास्था

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2016 02:59 IST2016-02-16T09:59:10+5:302016-02-16T02:59:10+5:30

आपल्या देशात विकसित होणाºया टेक्नोलॉजीबद्दल लोकांमध्ये फार अनास्था आहे

Disenchantment of research in the country | देशात संशोधनाबद्दल अनास्था

देशात संशोधनाबद्दल अनास्था

ong>कोणतेही नवीन तंत्रज्ञाना आपण विदेशातूनच आयात करतो. त्यामुळे आपल्या देशात विकसित होणाºया टेक्नोलॉजीबद्दल लोकांमध्ये फार अनास्था आहे. देशाचा विकास करायचा असेल तर स्वदेशी संशोधनाला महत्त्व दिले पाहिजे, असे मत बायोकॉन लिमिटेडच्या चेयरमन किरन मुझुमदार-शॉ यांनी व्यक्त केले. 

किरश मुझुमदार-शॉ म्हणाल्या, नाविन्यतेचा आपल्याकडे अभाव आहे. तसेच कोणी काही तरी वेगळे करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला सकारत्मक वातावरण नाही. आपण केवळ ग्राहक नाही तर निर्मातेदेखील होऊ शकतो असा विश्वास रुजविण्याची गरज आहे. तरच आपण स्पर्धेत टिकून राहू.



वैयक्तिक अनुभव शेअर करताना त्या म्हणाले की, ‘मी जेव्हा माझी कंपनी सुरू करू पाहत होते तेव्हा अनेकांनी मला मदत करण्याचे टाळले. आपल्या देशात तयार होणाºया तंत्रज्ञानापेक्षा आपण बाहेरूनच मागवू अशी त्यांची वृत्ती होती.

शेवटी आयसीआयसीआय बँकेचे पूर्व चेयरमन नारायण वाघून यांनी माझ्यावर विश्वास दाखवून गुंतवणूक केली. माझ्याकडे पेटेंट असल्यामुळे माझे तंत्रज्ञान एका बहुराष्ट्रीय कंपनीने खूप मोठी रक्कम मोजून खरेदी केले.’

Web Title: Disenchantment of research in the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.