अँजोलिना ज्युलीचा वेगळा अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 12:20 IST2016-01-16T01:14:31+5:302016-02-06T12:20:51+5:30

'बई द सी'मध्ये काम 'बई द सी'मध्ये काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता, असे म्हणणे आहे अँँजेलिना जोलीचे

A different experience from Angelina Julie | अँजोलिना ज्युलीचा वेगळा अनुभव

अँजोलिना ज्युलीचा वेगळा अनुभव

'
;बई द सी'मध्ये काम करण्याचा अनुभव खूपच वेगळा होता, असे म्हणणे आहे अँँजेलिना जोलीचे. मात्र या चित्रपटात पती ब्रॅड पिटची भूमिका असल्याने त्याच्यासोबत काम करणे सोपे नव्हते हेही ते स्पष्ट करते. अँँजेलिनाच्या या वक्तव्याचे सर्मथन करताना पिट म्हणाला की, चित्रपटातील काही दृश्य करणे खरच अवघड होते. मात्र अशातही आम्ही दोघांनी सर्वोत्तम भूमिका पार पाडली. शूटिंगनंतर आम्ही घरी एकत्र जात असल्याने चित्रपटाबाबतही चर्चा करीत होतो, त्यामुळे बर्‍याच गोष्टी सोप्या झाल्याचे पिट सांगतो.
स्पेक्टर हिट
जेम्स बॉँन्ड सिरीजचा २४ वा चित्रपट स्पेक्टरने सध्या जगभरात चांगलीच धूम केली आहे. केवळ दोनच आठवड्यात चित्रपटाने ३0 कोटी डॉलरपेक्षा अधिक कमाई केली आहे. वितरण कंपनी मेट्रो गोल्डविन मेयरचे अध्यक्ष गैरी बार्बर यांनी सांगितले की, या चित्रपटाला प्रेक्षकांनी स्वीकारल्याचे समाधान वाटते. बॉन्ड सिरीजचा जो दर्जा आहे, तो टिकविण्यात स्पेक्टर यशस्वी ठरला आहे. २0 नोव्हेंबर रोजी भारतात इंग्रजी, हिंदी, तामिळ आणि तेलगू भाषेत हा सिनेमा रिलीज होणार आहे.
लॉरेंस दबावात
हास्य अभिनेत्री रिबेल विल्सनला वाटते की, अभिनेत्री जेनिफर लॉरेंस हिचे नग्न फोटोज् लिक झाल्यामुळे तिच्यावर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे.
रिबेलने सांगितले की, तिला लॉरेंससारखे बदनामीचे आयुष्य नको. ती म्हणते, आम्ही दोघेही मोकळे आयुष्य जगणार्‍या आहोत, मात्र यशासाठी अशाप्रकारचे प्रदर्शन करण्यास मी कधीही होकार देणार नाही. लॉरेंसच्या या फोटोज्मुळे तिच्याबद्दल लोकांचा दृष्टिकोन बदल्याचे रिबेलचे म्हणणे आहे.

Web Title: A different experience from Angelina Julie

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.