डिकॅप्रियो करणार पर्यावरण रक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 12:12 IST2016-01-16T01:14:55+5:302016-02-07T12:12:40+5:30

हॉलिवूड सूपरस्टार लियानार्दो डिकॅप्रियो जोरकस अभिनयासोबतच त्याच्या पर्यावरणविषयक सामाजिक कामांसाठीसुद्धा ओळखला जातो. 

DiCaprio will protect the environment | डिकॅप्रियो करणार पर्यावरण रक्षण

डिकॅप्रियो करणार पर्यावरण रक्षण

लिवूड सूपरस्टार लियानार्दो डिकॅप्रियो जोरकस अभिनयासोबतच त्याच्या पर्यावरणविषयक सामाजिक कामांसाठीसुद्धा ओळखला जातो.

वाढत्या शहरी लोकसंख्येमुळे होणार्‍या प्रचंड वायूप्रदूषणाला आळा घालण्यासाठी विजेवर चालणारी 'ईलेक्ट्रिक कार' हा सवरेत्तम पर्याय आहे. यासंबंधी जनजागृती वाढविण्यासाठी डिकॅप्रियो प्रथमच होणार्‍या 'फॉर्म्युला-ई रेसिंग' या ईलेक्ट्रिक कारच्या रेसमध्ये सहभागी होणार आहे.

बिजिंगमध्ये होणार्‍या या स्पर्धेत त्याने 'व्हेंचुरी फॉर्म्युला-ई' संघ उतरविला आहे. ईलेक्ट्रिक कारमुळे कोणत्याच प्रकारचे प्रदूषण होत नाही.

याविषयी डिकॅप्रियो म्हणतो, 'शहरामध्ये होणार्‍या प्रदूषणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे. पुढच्या २0 वर्षांमध्ये जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी ८0 टक्के लोक शहरात राहणार आहेत. एवढय़ा लोकांच्या गरजा पुरवण्यासाठी आधीच ढासळलेल्या निसर्गाचे आणखी शोषण होणार. त्यामुळे विजेवर चालणार्‍या गाड्या काही प्रमाणात आशेचा किरण आहे.'

परंतु स्पर्धेला तो हजर असेल की नाही याबाबत अधिकृत माहिती नाही.

leo
 

Web Title: DiCaprio will protect the environment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.