डेव्हिड बेकहमचा मुलगा मोरेजच्या प्रेमात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 19:55 IST2016-05-11T14:25:06+5:302016-05-11T19:55:06+5:30
इंग्लंडचा माजी फुटबॉलर डेव्हिड बेकहमचा मुलगा ब्रुकलिन स्वत:पेक्षा दोन वर्षांनी मोठी असलेली प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री चोले मोरेजला डेट करत आहे. हा खुलासा खुद्द किक एस सीरीजच्या अॅक्ट्रेसने केला आहे.
.jpg)
डेव्हिड बेकहमचा मुलगा मोरेजच्या प्रेमात
इ ग्लंडचा माजी फुटबॉलर डेव्हिड बेकहमचा मुलगा ब्रुकलिन स्वत:पेक्षा दोन वर्षांनी मोठी असलेली प्रसिद्ध अमेरिकन अभिनेत्री चोले मोरेजला डेट करत आहे. हा खुलासा खुद्द किक एस सीरीजच्या अॅक्ट्रेसने केला आहे. ती म्हणाली, मी काय करते याच्याशी कुणालाही कसेलेही घेणे देणे नसावे. मात्र तरीही काही अफवा पसरण्याच्या आधी मीच सांगते की, मी ब्रुकलिनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. डेव्हिड-व्हिक्टोरियाचा मुलगा ब्रुकलिन १७ वर्षांचा आहे. तर मोरेज ही १९ वर्षांची आहे. ब्रुकलिन त्याच्या वडिलांप्रमाणेच चांगला फुटबॉलर आहे. तर दुसºया बाजूला मोरेजने कमी वयात सक्सेस मिळवले आहे. तिने जवळपास ५० हॉलीवुड चित्रपटांमध्ये काम केले आहे आणि लहाणमोठे साधारणपणे १०० अवॉर्ड तिने मिळवले आहे. 'Watch What Happens Live' टीव्ही शो मध्ये पोहोचलेल्या मोरेजने इंटरव्ह्यूमध्ये अनेक खुलासे केले आहेत. ती म्हणाली, या आधी माझे कुणाशीही अफेअर नव्हते. मी आणि ब्रुकलिन पहिल्यांदा लंडनला भेटलो. तेथुनच आमच्या प्रेमाला सुरु वात झाली.