डायनासोरचे भव्य अवशेष सापडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2016 03:15 IST2016-03-01T10:15:16+5:302016-03-01T03:15:16+5:30

अर्जेंटिनामधील पॅटागोनिया भागात चार वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर अद्भुत अशा डायनासोर अवशेषांचा शोध लागला आहे.

Dangerous residues of dinosaurs were found | डायनासोरचे भव्य अवशेष सापडले

डायनासोरचे भव्य अवशेष सापडले

थ्वीचा इतिहास अनेक रहस्यांनी भरलेला आहे. एक एक करत आपल्याला ते माहित होत आहे. लाखो वर्षांपूर्वी या भूतलावर राज्य करणारे डायनासोर काळाच्या ओघात नष्ट झाले. केवळ अवशेष आणि सांगाड्याच्या रुपाते ते उरले आहेत.

असेच अवशेषांचा खजिना संशोधकांना आढळला आहे. अर्जेंटिनामधील पॅटागोनिया भागात चार वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर अद्भुत अशा डायनासोर अवशेषांचा शोध लागला आहे. साठ हजार चौ.किमी एवढ्या विशाला भागात हे अवशेष पसरलेले आहेत. 

जगामध्ये अद्याप इतर कोठेही इतके वैविध्यपूर्ण अवशेष एकाच जागी सापडलेले नाहीत, अशी माहिती रिजनल सेंटर फॉर सायंटिफिक रिसर्च अँड टेक्नोलॉजी ट्रान्सफरचे (सीआरआयएलएआर) भूशास्त्रज्ञ युआन गार्सिया मसानी यांनी दिली.

हे अवशेष सुमारे १४ ते १६ कोटी वर्षे जूने आहेत. जमिनीची धूप झाल्यामुळे ते आता पृष्ठभागावर आले आहेत. यामुळे ज्युरॅसिक कालखंडातील अनेक गोष्टींची माहिती आणि रहस्यांची उलगड होणार आहे.

Web Title: Dangerous residues of dinosaurs were found

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.