2040 मध्ये महाभुखमरी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 14:01 IST2016-01-16T01:20:36+5:302016-02-07T14:01:25+5:30
सध्या दुष्काळाच्या झळा आपण सोसतच आहोत.

2040 मध्ये महाभुखमरी?
स ्या दुष्काळाच्या झळा आपण सोसतच आहोत. गणरायाच्या आगमनानंतर काही ठिकाणी पाऊस पडून थोडाफार दिलासा मिळाला मात्र परिस्थिती अजूनही गंभीर आहे. परंतु भविष्य तर यापेक्षा अधिक भयावह आणि अंधकारमय आहे. 2040 मध्ये पृथ्वीवर अन्नधान्याचे उत्पन्न 'ना' च्या बरोबर होणार असून आतापर्यंत कधीही न अनुभवलेल्या महाभुखमरीला आपल्याला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. एका वैज्ञानिक मॉडेलमधून असा दावा करण्यात आला आहे की, वातावरणात होणारे बदल आणि आपली शेतीची पद्धत यामुळे भविष्यात अन्नधान्याच्या पुरवठय़ावर फार वाईट परिणाम होईल. जगभरामध्ये खाण्यासाठी दंगली होतील. 'ग्लोबल सस्टेनेबिलिटी इन्स्टीट्युट'च्या वैज्ञानिकांनी हे शास्त्रीय मॉडेल बनविले आहे. याबाबत संचालक डॉ. अँलेड जोन्स म्हणाले, 'आम्ही केलेल्या प्रयोगातून आणि गोळा केलेल्या माहितीवरून भविष्यातील पृथ्वीचे एक मॉडेल बनविले. त्यातून असे स्पष्ट झाले की, वातावरणात होणार्या धोकादायक बदलांमुळे आपल्या ग्रहावर अन्नधान्याचे उत्पादन अगदी नगण्य होईल. सगळीकडे लोक अन्नाच्या एक एक कणासाठी लढू लागतील. यामुळे आपली मानवी सभ्यताही संपूष्टात येण्याचा धोका नाकारता येत नाही.'