​सायरस मिस्त्रींचे पाय अजुनही जमिनीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2016 17:15 IST2016-05-17T11:45:54+5:302016-05-17T17:15:54+5:30

या फोटोमध्ये ते एका ढाब्यावर मस्तपैकी मांडी घालून जेवण करत आहेत.

Cyrus Mistry's legs still on the ground | ​सायरस मिस्त्रींचे पाय अजुनही जमिनीवर

​सायरस मिस्त्रींचे पाय अजुनही जमिनीवर

माणसाने कितीही यश कमावले तरी त्याची हवा कधी डोक्यात जाऊ द्यायची नसते. आकाशाकडे नजर ठेवावी मात्र पाय नेहमीच जमिनीवर राहू द्यावे अशी शिवकण आपली संस्कृती देते.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे सायरस मिस्त्री.

भारतातील सर्वात मोठ्या कंपनीपैकी एक टाटा ग्रुपचे ते चेअरमन आहेत. रतन टाटांप्रमाणाचे त्यांचे वारसदार सायरसदेखील विनम्र आहेत. सध्या त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.

या फोटोमध्ये ते एका ढाब्यावर मस्तपैकी मांडी घालून जेवण करत आहेत. टाटा ग्रुपचा चेअरमन आणि ढाब्यांच्या बाजेवर मांडी घालून जेवताना पाहून कोणालाही आश्चर्य होईल.

व्यावसायिक हर्ष गोएंका यांनी हा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. ते लिहितात, सायरस खूप चांगला व्यक्ती आहे. त्याचे पाय सदैव जमिनीवर टेकलेले असतात. याबाबत टाटा सनसच्या प्रवक्त्याने खुलासा केला की, हा फोटो मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात काढलेला आहे. 

मिस्त्री कोठे जात होते किंवा त्यांनी कोणत्या ढाब्यावर जेवण केले याची काही उपलब्ध नाही. परंतु त्यांचा साधेपणा आणि ‘कॉमन मॅन’ प्रतिमा त्यांच्या पदाच्या लोकांमध्ये फारच कमी पाहायला मिळतो.

{{{{twitter_post_id####}}}}


आलिशान बंगले आणि महागड्या गाड्यांनी आपली श्रीमंती दाखविणाºया व्यावसायिकांनी मिस्त्रींकडून खूप काही शिकण्यासारखे आहे.

Web Title: Cyrus Mistry's legs still on the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.