कर्करोगाच्या पेशी नष्ट करणार्या बायोजेलची निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 15:16 IST2016-01-16T01:09:42+5:302016-02-04T15:16:33+5:30
वैज्ञानिकांनी कर्करोगाच्या पेशी नष्ट करणार्या बायोजेलची निर्मिती केली आहे. त्यामुळे क...
.png)
कर्करोगाच्या पेशी नष्ट करणार्या बायोजेलची निर्मिती
व ज्ञानिकांनी कर्करोगाच्या पेशी नष्ट करणार्या बायोजेलची निर्मिती केली आहे. त्यामुळे केवळ कर्करोगाच्या पेशी मारल्या जातात व इतर पेशींना अपाय होत नाही. कॅनडामधील माँट्रियल रुग्णालयाच्या संशोधन केंद्राने हे संशोधन केले असून त्याची प्रयोगशाळेतील चाचणी यशस्वी झाली आहे. रुग्णांवर ही उपचार पद्धत योग्य पद्धतीने वापरता आली तर कर्करोगाच्या उपचारात क्रांतिकारी बदल घडणार आहेत. विशेष म्हणजे, सर्व प्रकारच्या कर्करोगावर त्याचा उपयोग होईल.

