तनिष्कचे आधुनिक वंशपरंपरागत दागिन्यांचे कलेक्शन 'धरोहर' संगे यंदाच्या दिवाळीत निर्माण करा कालातीत वारसा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2023 18:00 IST2023-11-07T16:32:30+5:302023-11-07T18:00:48+5:30
यंदा निर्माण करा तुमचा स्वतःचा वारसा; शानदार भूतकाळाची जादुई सफर

तनिष्कचे आधुनिक वंशपरंपरागत दागिन्यांचे कलेक्शन 'धरोहर' संगे यंदाच्या दिवाळीत निर्माण करा कालातीत वारसा
तनिष्कचे सर्वात नवीन फेस्टिव्ह ज्वेलरी कलेक्शन 'धरोहर'मध्ये साजरा करा कालातीत परंपरा आणि जतन करून ठेवलेल्या वारशाचा आनंद. हे कलेक्शन म्हणजे आपल्या समृद्ध परंपरेची जादुई सफर आहे. आपला शानदार भूतकाळ आणि आधुनिक वर्तमानकाळ यांना जोडणारा हा कलात्मक सुंदर पूल आहे. त्यामुळे हे कलेक्शन खऱ्या अर्थाने आधुनिक वारसा ठरले आहे. प्राचीन काळापासून चालत आलेल्या समृद्ध कलात्मकतेपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेले 'धरोहर' हे कलेक्शन खोलवर रुजलेल्या आपल्या परंपरांचा सन्मान करते आणि गतकाळातील सोनेरी आठवणी पुन्हा जाग्या करते. राजसी शान दर्शनवणाऱ्या आधुनिक कुंदन दागिन्यांपासून आधुनिक प्लेन गोल्ड दागिन्यांपर्यंत आमच्या या कलेक्शनसोबत दिवाळीत तुम्ही मिळवू शकाल कालातीत वारसा निर्माण करण्याचा आनंद. तनिष्कच्या धरोहर कलेक्शनमधील या काही दागिन्यांची ओळख करून घेऊ या आणि प्रत्येक दागिन्यातील वारसा व आधुनिकता यांचा मिलाप जाणून घेऊ या.
शानदार उत्सव साजरा करा, हे दागिने तुमचे शाश्वत सौंदर्य आणि समृद्ध वारसा यांचे प्रतिबिंब बनतील. इथे आम्ही प्रस्तुत करत आहोत ६ असाधारण दागिने जे तुम्हाला आश्चर्यचकित करतील.
१. शानदार फिरोझी नेकलेस वारशाची नवी व्याख्या रचेल.
तनिष्कचा हा आधुनिक बाधरुम नेकलेस तुमची स्टाईल वाढवतो आणि दीर्घकाळपर्यंत टिकून राहील असा वारसा निर्माण करतो. हा मास्टरपीस परंपरा आणि आधुनिक आकर्षण यांचा मिलाप आहे. अतिशय मनमोहक बाधरूम पॅटर्नमध्ये घडवलेला हा नेकलेस फिरोझी रंगाच्या स्टोन्समधून सुबकपणाचे सार दर्शवतो. याचे मदर-ऑफ-पर्ल वर्क अतिशय नाजुक आणि आकर्षक आहे. हा नेकलेस परिधान करणाऱ्या व्यक्तीची अनोखी स्टाईल आणि ती ज्या वारशाचे प्रतिनिधित्व करते तो वारसा दर्शवतो. दिवाळीच्या सोहळ्यामध्ये पारंपरिक रेशमी साडीसोबत किंवा लग्नामध्ये स्टायलिश लेहेंग्यासोबत किंवा पार्टीमध्ये फ्युजन आऊटफिटसोबत हा नेकलेस घालून तुम्ही प्रत्येक प्रसंगाची शान आणि सौंदर्य वृद्धिंगत कराल. तुम्ही जिथे जाल तिथे अभिजात लावण्याचे प्रतीक म्हणून ओळखल्या जाल.
२. प्रत्येक बारकाव्यांतील नाजुक कलात्मकता
प्रत्येक बारकावा नीट लक्षात घेऊन डिझाईन करण्यात आलेला तनिष्कचा चोकर नेकलेस सेट खऱ्या अर्थाने जादुई आहे. अतिशय कौशल्याने घडवण्यात आला आहे. तीन कुशल कारागिरांनी महिन्याभरात अतिशय मेहनतीने घडवलेल्या सेटचे डिझाईन पोपटाच्या आकारापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आले आहे. जाळी आणि रसरावा काम व नाजुक चांडक तपशील याचे वैशिष्ट्य आहे. आकर्षक निळ्या व गुलाबी स्टोन्सनी सजवलेला, एमरल्ड ड्रॉप्सची सजावट असलेला हा नेकलेस पिढ्यापिढ्यांपासून चालत आलेली कलात्मकता दर्शवतो. खार फेस्टिव्ह लुकची शान वाढवण्यासाठी या चोकर सेटसोबत पारंपरिक पेहराव घाला. लग्नामधअये पेस्टल ऑर्गनझा साडी किंवा लेहेंगा किंवा अनारकली सूटसोबत हा चोकर तुम्हाला कायम स्पॉटलाईटमध्ये ठेवेल.
३. धरोहर सौंदर्य जिवंत करणारा रॉयल पेंडंट नेकलेस
कलात्मकता आणि सर्जनशीलता यांचे खरे प्रतीक असलेल्या तनिष्कच्या पेंडंट-स्टाईल नेकलेस सेटसोबत उत्सवांच्या मनमोहक विश्वात पदार्पण करा. कुशल कारागिरांनी महिनाभराच्या मेहनतीने अतिशय सुबकपणे घडवलेला हा अनोखा नेकलेस हिरव्या, निळसर जांभळ्या आणि मदर-ऑफ-पर्ल स्टोन्सचा अतुनीय मिलाप दर्शवतो. राजसी पेहरावातील नाजुक आरशांपासून प्रेरणा घेऊन हा नेकलेस डिझाईन करण्यात आला आहे. हा नेकलेस वारसा आणि आठवणींच्या खजिन्याचा सन्मान आहे. सणासुदीची शान वाढवण्यासाठी या नेकलेससोबत पारंपरिक कपडे परिधान करा. यातील उत्साह तुमच्यामध्ये आपोआप झळकू लागेल.
४. नाजुक डोरी पोवई नेकलेस
दोन कुशल कारागिरांनी संपूर्ण महिनाभर अतिशय मेहनतीने घडवलेला हा मास्टरपीस तनिष्कचा सुंदर नेकलेस वारसा आणि आधुनिक आकर्षणाचा मिलाप आहे. नाजुक डोरी पोवई तंत्र वापरून घडवण्यात आलेला हा नेकलेस त्यांची कला व कारीगरी दर्शवतो. रसरावा, फिलिग्री आणि चांडक डिझाईन या नेकलेसला उत्कृष्ट कलेचा नमुना बनवते. त्यामुळे आधुनिक वारशासाठी हा अतिशय साजेसा आहे. धरोहरचे सार दर्शवणारा हा नेकलेस भूतकाळाची कहाणी सांगतो आणि तुमचा वर्तमानकाळ देखील घडवतो. हा नेकलेस परिधान करून तुम्ही उत्सव स्टाईलमध्ये साजरा करू शकता, प्रत्येक प्रसंग संस्मरणीय व शानदार बनवू शकता.
५. प्रत्येक तपशीलांमध्ये कारीगरी
तनिष्कचा हा शानदार नेकलेस परिधान करून तुम्ही वारशाच्या कालातीत आकर्षणामध्ये सामावू शकतो. प्राचीन काळापासून चालत आलेल्या संगमरवरी सिंहासनाच्या नाजूक कारीगरीपासून प्रेरणा घेऊन हा नेकलेस घडवण्यात आला आहे. हा नेकलेस धरोहर कलेक्शनच्या कलात्मकतेचा प्रतीक आहे. प्राचीन प्रेरणांना आकर्षक आधुनिक अलंकारामध्ये सहज परिवर्तित करतो. अनेक पिढ्यांनी जपून ठेवावा असा हा दागिना आहे. लग्नामध्ये लक्झरियस वेलवेट लेहेंग्यासोबत हा नेकलेस नवरीच्या साजशृंगाराला आगळीवेगळी शान प्रदान करेल.
६. तनिष्कची चमकदार सोन्याची बांगडी सणाचा आनंद द्विगुणित करेल.
धरोहर कलेक्शनमधील ही अतिशय सुंदर आणि शानदार बांगडी, अतिशय प्रेमाने, प्रत्येक तपशीलाकडे नीट लक्ष देऊन घडवण्यात आली आहे. नाजुक जाळी काम आणि चांडक लिंक्समधून परंपरा आणि कारीगरी यांचा मिलाप करण्यात आला आहे. हे डिझाईन कालातीत आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सोपवला जाणारा वारसा दर्शवते. तुम्हाला तुमच्या वारशाशी जोडते. ट्रेंडी इंटो-वेस्टर्न आऊटफिटसोबत ही बांगडी सर्वांचे लक्ष वेधून घेईल. त्यासोबत स्टेटमेंट इयरिंग्स आणि एक क्लच तुमचे अनोखेपण ठळपणे दर्शवतील.
तनिष्कच्या या दागिन्यांसह तुमची कालातीत शान आणि वारसा यांचा सोहळा साजरा करा. प्रत्येक दागिना कलात्मकता आणि पुढे सांगितली जाईल अशी कहाणी दर्शवतो. या सहा दागिन्यांमध्ये तुम्हाला इतिहास आणि आधुनिक शान यांची सांगड आढळेल. त्यामुळे ते एक परफेक्ट आधुनिक वारसा बनतील, जो तुम्ही तुमच्या पुढील पिढ्यांना सोपवू शकाल. तनिष्कचे धरोहर कलेक्शन जुन्या व नवीन वारशाचा सन्मान आहे, कलात्मक वारशापासून प्रेरणा घेऊन घडवण्यात आले आहे. सोने, हिरे, कुंदन आणि पोल्कीपासून बनवलेल्या आयकॉनिक तनिष्क डिझाइन्सची ही विशाल श्रेणी अनेक वेगवेगळ्या प्रसंगांसाठी आणि विविध आवडीनिवडींसाठी साजेशी आहे. तनिष्कचे धरोहर कलेक्शन यंदाच्या सणासुदीच्या काळात तुमच्या समृद्ध वारशाकडे घेऊन जाईल. पुढील पिढ्यांना वारसा सोपवण्याचा आनंद साजरा करा.
यंदाच्या दिवाळीत तनिष्कसोबत आनंद साजरा करा. सोन्याच्या दागिन्यांच्या घडणावळीवर आणि हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मूल्यावर २०%* पर्यंतची विशेष सूट मिळवून हा आनंद द्विगुणित करा. १००%* एक्स्चेंज मूल्य मिळवून घरी आणा तुमचा वारसा. ही ऑफर मर्यादित कालावधीपुरती राहील. तनिष्कचा ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म https://www.tanishq.co.in/dharohar आणि तुमच्या जवळच्या तनिष्क स्टोर्समध्ये याचा लाभ घेता येईल.
अटी व नियम लागू आहेत.