या पडक्या घराची किंमत तीन कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2016 13:02 IST2016-02-04T07:32:41+5:302016-02-04T13:02:41+5:30
फोटोत दिसत असलेल्या पडक्या घराची किंमत पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. हे घर लास एंजेलिसच्या नॉर्थब्रिज येथे असून 1,276 स्क्वेअर फूट इतके मोठे आहे. इतक्या खराब स्थितीत असूनही या घराची किंमत तब्बल 3,22,93,088 रुपये एवढी आहे. या घराची इतकी प्रचंड किमत असण्याचे कारण आहे तेथील परिसर. हा परिसर येथील फिल्म इंडस्ट्री आणि स्पोर्ट्स प्लेयर्सचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळेच या घराची किंमत इतकी अधिक आहे. 1965 मध्ये हे घर बनवण्यात आले होते. आॅनलाइन वेबसाइटवर लिस्ट केल्यानंतर 10 दिवसांच्या आत आतापर्यंत 123,476 लोकांनी हे घर पाहिलेय. इतकी मोठी किंमत दिल्यानंतरही तुम्हाला घर नीट करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील. तसेच हे घर खरेदी करायचे असल्यास केवळ रोख रक्कम स्वीकारले जाणार असल्याचीही अट ठेवण्यात आलीये.

या पडक्या घराची किंमत तीन कोटी
फ टोत दिसत असलेल्या पडक्या घराची किंमत पाहून तुम्ही नक्कीच हैराण व्हाल. हे घर लास एंजेलिसच्या नॉर्थब्रिज येथे असून 1,276 स्क्वेअर फूट इतके मोठे आहे. इतक्या खराब स्थितीत असूनही या घराची किंमत तब्बल 3,22,93,088 रुपये एवढी आहे. या घराची इतकी प्रचंड किमत असण्याचे कारण आहे तेथील परिसर. हा परिसर येथील फिल्म इंडस्ट्री आणि स्पोर्ट्स प्लेयर्सचे आवडते ठिकाण आहे. त्यामुळेच या घराची किंमत इतकी अधिक आहे. 1965 मध्ये हे घर बनवण्यात आले होते. आॅनलाइन वेबसाइटवर लिस्ट केल्यानंतर 10 दिवसांच्या आत आतापर्यंत 123,476 लोकांनी हे घर पाहिलेय. इतकी मोठी किंमत दिल्यानंतरही तुम्हाला घर नीट करण्यासाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील. तसेच हे घर खरेदी करायचे असल्यास केवळ रोख रक्कम स्वीकारले जाणार असल्याचीही अट ठेवण्यात आलीये.