जेवनाचे रु पांतर दारूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 05:32 IST2016-03-02T12:32:47+5:302016-03-02T05:32:47+5:30
शरीरात अल्कोहोल आहे याच्या सर्व चाचण्या सकारात्मक येऊनही एक शिक्षिका वारंवार पोलिसांच्या कचाट्यातून सुटते.

जेवनाचे रु पांतर दारूत
या महिलेला एका विचित्र आजाराने त्रस्त केले आहे. हा आजार आहे आॅटो ब्रेवरी सिंड्रोम. या आजारामध्ये व्यक्तीने जे काही खाल्ले त्याचे रुपांतर नैसर्गिकरित्या मद्यात होते. तिने जे काही खाल्ले त्याची रासायनिक प्रक्रिया होऊन त्याचे रुपांतर मद्यात होते.
ही महिला एकदा आपली टोयटो कोरोला चालवत होती. तिचे गाडीवर नियंत्रण नव्हते. त्यावेळी पोलिसांनी तिला पकडले आणि तिला ताब्यात घेतले. तिची चाचणी पोलिसांनी घेतली. तेव्हा तिच्या शरीरात कायदेशीरदृष्ट्या वैध असणाºया प्रमाणापेक्षा चौपट अल्कोहोल होते.
प्रकरण कोर्टात गेले. तिच्या वकिलांनी न्यायालयात सर्व खुलासा केला की या महिलेने कार्बोहायड्रेड खाल्ले तर त्याचे किण्वन होऊन ते मद्यात रुपांतरीत होते.