आॅफिसमधील राजकारणाचा पडतो असाही परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2016 20:49 IST2016-08-11T15:19:40+5:302016-08-11T20:49:40+5:30

वरिष्ठ आणि सहकर्मचाऱ्यांकडून होणारी पिळवणूक, टोमणे, कमी लेखण्याची वृत्ती यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर फार विपरित परिणाम होतो.

The consequences of office politics also fall | आॅफिसमधील राजकारणाचा पडतो असाही परिणाम

आॅफिसमधील राजकारणाचा पडतो असाही परिणाम

ं म्हणतात की, आपल्या आसपासच्या वातावरणाचा आपल्या व्यक्तीमत्वावर परिणाम होत असतो. आता जर असे असेल तर कामाच्या ठिकाणी होणारे राजकारण किंवा दबावाचा आपल्यावर कसा परिणाम होत असेल याची कल्पना कधी केली आहे? वरिष्ठ आणि सहकर्मचाऱ्यांकडून होणारी पिळवणूक, टोमणे, कमी लेखण्याची वृत्ती यामुळे कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर फार विपरित परिणाम होतो.

संशोधकांच्या एका गटाने केलेल्या एका अध्ययनानुसार, आॅफिसमधील नकारात्मक वातावरणामुळे कर्मचाऱ्यांमध्येदेखील नकारात्मकता वाढते. आत्मनियंत्रण गमावून कर्मचारी अधिक हिंसक व टोकाची भूमिका घेतात. सहकार्याची भावना कमी होऊन कुरघोडी करण्याची वृत्ती अधिक बळावते, असे संशोधकांचे म्हणने आहे.

आॅफिसमध्ये सततच्या होणाऱ्या शेरेबाजीमुळे मेंदूवरदेखील तणाव वाढतो. आॅफिसमध्ये आपल्या विरुद्ध कोणी तरी कारस्थान करत आहे या भीतीमुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता कमी होऊन त्यांची कामगिरी ढासळते, असे मिशिगन स्टेट विद्यापीठातील व्यवस्थानाचे सह प्राध्यापक रसेल जॉन्सन यांनी सांगितले.

मानिसक तणावामुळे व्यक्तिचे स्वत:वरचे नियंत्रण कमी होऊन तो इतरांशी मनात राग ठेवून वागतो. त्यामुळे कामाच्या ठिकाणी वादविवाद वाढतात. ज्याचा विपरित परिणाम आॅफिसच्या कामावर होतो. मागच्या दोन दशकांचा विचार केला असता कामाच्या ठिकाणी असे वातावरण असल्यामुळे कंपन्यांना प्रति कर्मचारी दरवर्षी सरासरी १४ हजार डॉलर्सचे नुकसान सहन करावे लागते.

Web Title: The consequences of office politics also fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.