फॅशनच्या दुनियेत यंदाचा कलर आॅफ द इयर आहे ‘फॉग ग्रीन’! तुम्ही तुमच्यासाठी यातली कोणती शेड निवडताय?
By Admin | Updated: May 31, 2017 18:21 IST2017-05-31T18:21:05+5:302017-05-31T18:21:05+5:30
फ्रॉग ग्रीन या रंगाची निवड कलर आॅफ दी इयर म्हणून करण्यात आली आहे.त्यामुळे यंदा फॅशन जगतातही याच रंगाची चलती आहे.

फॅशनच्या दुनियेत यंदाचा कलर आॅफ द इयर आहे ‘फॉग ग्रीन’! तुम्ही तुमच्यासाठी यातली कोणती शेड निवडताय?
- मोहिनी घारपुरे-देशमुख
फॅशन जगतावर प्रभाव असलेला पेन्टॉन कलर आॅफ 2017 म्हणून ‘हिरवा’ रंग घोषीत करण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी हिरव्या रंगातली ‘फ्रॉग ग्रीन’ ही शेड फॅशन जगातील ट्रेण्डींग कलर ठरली आहे. म्हणूनच फॅशन डिझायनर्सकडूनही त्यास पसंती दिली जात आहे.
2000 सालापासून ढंल्ल३ङ्मल्ली कल्लू या न्यू जर्सीतील कंपनीतर्फे प्रतिवर्षी दोनदा कलर आॅफ द इयरची घोषणा केली जाते. त्याकरिता विविध देशांतील कलर स्टँडर्ड ग्रुप्सच्या प्रतिनिधींची दोन दिवसीय बैठक वर्षातून दोनदा आयोजित केली जाते. या बैठकीमध्ये वादविवाद आणि प्रेझेंटेशन यांच्या माध्यमातून ‘कलर आॅफ दी इयर’ निवडला जातो. त्यानंतर हा रंग फॅशन डिझायनर्स, फ्लोरिस्ट्स आणि अन्य कंपन्या आपल्या उत्पादनांमध्ये प्रामुख्यानं वापरतात. गेल्या वर्षी रोझ क्वार्ट्झ (गुलाबी रंगातील शेड) आणि सेरेनिटी (निळ्या रंगातील शेड) कलर आॅफ दी इयर म्हणून घोषित करण्यात आली होती.