फॅशनेबल राहण्यासाठी ‘कलर ब्लॉकिंग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2016 05:43 IST2016-03-02T12:43:59+5:302016-03-02T05:43:59+5:30
रंगाचा व्यवस्थित वापर करण्याला कलर ब्लॉकिंग म्हणतात

फॅशनेबल राहण्यासाठी ‘कलर ब्लॉकिंग’
एक तर अॅनालॉगस पद्धतीने म्हणजे एकाच रंगाच्या विविध शेड वापरून किंवा कॉम्प्लिमेंटरी पद्धतीने म्हणजे एकमेकांशी विसंगत रंग वापरुन. सर्वसाधारणपणे पांढºया रंगाच्या साडीला शेंदरी रंगाचा ब्लाऊज किंवा निळ्या डेनिमवर पिवळ्या रंगाचा शर्ट इतपत रंगांची संगती आपण लावत असतो.
एखाद्या विशिष्ट रंगाचा किंवा दोन-तीन रंगांचा विशिष्ट रितीने कपडयात किंवा वस्तूच्या रंगात वापर केलेला असेल तर त्याला मात देण्यासाठी तिथे चांगला सुसंगत व त्या इतर रंगांपेक्षाही उठून दिसेल अशा एखाद्या वेगळ्याच रंगाचा वापर त्यात करायला हवा. उदाहरणार्थ पिवळ्या रंगाच्या स्ट्रेटकट ड्रेसला खाली चॉकलेटी पट्टी असेल तर या ड्रेसला हिरव्या बाह्या लावता येतात.