तिन्ही राजकुमारी एकत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2016 08:16 IST2016-03-06T15:16:11+5:302016-03-06T08:16:11+5:30
सिंधिया घराच्या तिन्ही राजकुमारी उषा राजे,वसुंधरा राजे व यशोधरा राजे यांना एकत्र पाहण्याचा दुर्मिळ योग अलीकडे जुळून आला.

तिन्ही राजकुमारी एकत्र
स ंधिया घराच्या तिन्ही राजकुमारी उषा राजे,वसुंधरा राजे व यशोधरा राजे यांना एकत्र पाहण्याचा दुर्मिळ योग अलीकडे जुळून आला. निमित्त होते काल शनिवारी शिवपुरीत पार पडलेल्या एका विवाह सोहळ्याचे. या सोहळ्याला नेपाळ राज परिवारातील पशुपति शमशेर जंग यांच्या पत्नी उषा राजे, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मध्य प्रदेशच्या उद्योग मंत्री यशोधरा राजे या तिन्ही राजकुमारींनी एकत्र हजेरी लावली. तिघीही एकत्र हेलिकॉप्टरमधून शिवपुरीस आल्या. त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण शहर जमले. तिन्ही बहिणींची एक झलक पाहायला मिळावी म्हणून लोकांनी एकच गर्दी केली.