CNX STYLE GUIDE : हिवाळ्यात वापरा ‘शॅकेट्स’
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 18:39 IST2016-11-06T18:39:08+5:302016-11-06T18:39:08+5:30
शॅकेट म्हणजे शर्ट+जॅकेट. शर्टसारखे बटण, हाताच्या बाह्या असणारे शॅकेटस् जॅकेटसाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्यांपासून बनवले जातात.

CNX STYLE GUIDE : हिवाळ्यात वापरा ‘शॅकेट्स’
न व्हेंबर महिन्यात मस्त थंडी पडायला सुरुवात झाली आहे. वर्षभर कपाटात राहणारे स्वेटर, जॅकेट्स आता बाहेर दिसू लागले आहेत. दिवसा तर नाही पण सायंकाळी लोक गरम कपडे घालूनच बाहेर पडताहेत. जाड-जूड तिबेटियन जॅकेट किंवा स्वेटरचा प्रॉब्लेम म्हणजे ते दैनंदिन काम करण्यासाठी कम्फर्टेबल नसतात.
त्याला पर्याय म्हणून सध्या ‘शॅकेट’ लोकप्रिय होऊ लागले आहेत. शॅकेट म्हणजे शर्ट+जॅकेट. शर्टसारखे बटण, हाताच्या बाह्या असणारे शॅकेटस् जॅकेटसाठी वापरण्यात येणाऱ्या कपड्यांपासून बनवले जातात. विशेष म्हणजे तुम्ही हे आॅफिसलाही घालून जाऊ शकता आणि बाहेर फिरायलाही वापरू शकता.
आॅफिशियल लूकसाठी रग्गीश लिनेन किंवा लाईन डेनिम शॅकेट वापरावे. तुम्हाला जर प्रिंटेड कपडे आवडत असतील शॅकेटस्मध्येसुद्धा अनेक प्रकारचे प्रिंटेड पॅटर्न उपलब्ध आहेत. कॅज्युअल म्हणून तुम्ही चेकर्ड शॅकेट घालू शकता.
योग्य प्रकारचे शॅकेट घालताना पुढील गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे असते.
![]()
योग्य मटेरिअल
केवळ जाड शर्ट किंवा डेनिम शर्ट म्हणजे शॅकेट नाही. शर्टचे मुळ फीर्चस परंतु जॅकेटसाठी वापरल्या जाणाऱ्या मटेरिअलपासून ते बनलेले असावेत. त्यामध्ये, स्वेड किंवा डेनिमसारखे स्मार्ट आॅप्शन तुम्ही निवडू शकता. शिवाय लाईनड् वूल, कॉटन आणि लिनेनचासुद्धा पर्याय आहेच.
लेयर्स
ड्रेसवर हलके टॉप लेयर म्हणून शॅकेट्सचा उपयोग करणे अपेक्षित आहे. त्यामुळे तुम्ही फॉर्मल शर्टवरसुद्धा तो घालून शार्प लूक मिळवू शकता. शिवाय कॉलेजसाठी टी-शर्टवर शॅकेट टाक ले की परफेक्ट ड्रेसिंग होते. मल्टी-पर्पज, मल्टी-यूज अशी त्यांची खासियत असते.
बटण लावा
परफेक्ट लूकसाठी शॅकेटचे मधले तीन बटण लावण्यावर नेहमी भर द्या. त्यामुळे शॅकेटच्या आतून घातलेली लेयर बाहेर दिसते आणि तुम्ही अधिक स्मार्ट दिसता. पूर्ण बटण उघडे ठेवल्यावर शॅकेट हवेत उडत राहील. जे मुळीच चांगले दिसणार नाही.
प्रेरणा आणि उदहारण म्हणून हे तीन सेलिब्रेटींचे शॅकेट्स पाहा.